पालकमंत्री फुके यांनीच मला फसवण्याचे षडयंत्र रचले : आमदार चरण वाघमारे

तुमसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजपचे आमदार चरण वाघमारे यांनी, त्यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या प्रकरणाला खोटे ठरवत, ते जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फुके यांनी रचलेले षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

 

ब्रेनवृत्त | प्रतिनिधी

भंडारा, ०६ ऑक्टोबर

तुमसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि आगामी विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहिलेले चरण वाघणारे यांनी आज कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ. परिणय फुके यांच्यावर वैयक्तीकरित्या जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. पालकमंत्र्यांनी आपल्याला खोट्या प्रकरणात फसवण्याचे षडयंत्र रचल्याचे जाहीर आरोप वाघमारे यांनी केले आहे. यामुळे दोन्ही  जिल्ह्यांच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.

चरण व

भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चरण वाघमारे यांच्यावर महिला पोलीसाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, संबंधित गुन्हा चुकीचा असून त्याविषयी पालकमंत्र्यांनीच आपल्याविरुद्ध षडयंत्र रचला असल्याचा आरोप वाघमारे यांनी लावला आहे. “आपल्यावर 20 वर्षांपूर्वी तुरुंगात जाण्याची वेळ आली होती, त्यानंतर पुन्हा तुरुगांत जाण्याची वेळ येईल असे कधीच वाटले नव्हते. परंतु खोट्या विनयंभंगाच्या प्रकरणात मला फसवून न्यायालयातून जामीन मिळू नये, यासाठी पालकमंत्र्यांनीच प्रयत्न केलेत” असे म्हणत चरण वाघमारे यांनी पालकमंत्री परिणय फुके यांच्यावर लावले आहेत.

गोसिखुर्द प्रकल्पग्रस्तांचे आमदार निवासावर आंदोलन!

सोबतच, निवडणूक लढवण्यास अडथळा आणण्याचे प्रयत्न फुके यांनी केले असल्याचा आरोपही वाघमारे यांनी लावला. “शासकीय वकील असतानासुद्धा, नागपूरवरुन वकील का आणावे लागले? तरीही, वाघमारे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून थांबणार नाही, हे माहीत असल्याने वकिलाने हजेरीच लावली नाही. आपल्याला आता कायमस्वरूपी जामीन मिळाला आहे, त्यामुळे निवडणूक लढणार आहे”, असा वाघमारे यांनी म्हटले आहे.  पुढे बोलताना ते म्हणाले, “आपण तुरुगांतच राहू आणि उमेदवारी अर्ज भरु शकणार नाही असा फुकेंचा समज होता. परंतु तसे झाले नाही. आपण उमेदवारी अर्ज भऱला आणि तो कायम राहिला” असेही वाघमारे म्हणाले.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर मतदारसंघाचे भाजपचे आमदार चरण वाघमारे यांना महिला पोलीस उपनिरीक्षक यांच्या विनयभंगप्रकरणी १८ सप्टेंबरला अटक करण्यात आली होती.

 

● भाजप-शिवसेनेने आपला गेम केला

ऐनवेळी भाजप आणि शिवसेनेने आपल्याला दगा दिला असल्याचे आमदार वाघमारे यांनी आरोप लावला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याचाही निवडणुकीत कायम राहा, आम्ही मदत करु अशा आश्वासनाचा फोन आला असल्याचेही त्यांनी सांगितले. सोबतच, “प्रदिप पडोळे व काही पक्षाचे नेते आले. पडोळेंनी पाया पडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याची काही गरज नाही असे सांगत माझा मार्ग वेगळा आणि तुमचा वेगळा असे सांगितले. जर तुम्हाला माहित होते मला उमेदवारी मिळणार नाही, तर मला का 4 महिन्याआधीच सांगितले नाही?” असाही प्रश्न खासदारांना केला असल्याचे ते म्हणाले.

विधानसभेच्या मुहूर्तावर व्यंगचित्रांतून अशीही जनजागृती ! 

● वेळप्रसंगी नाना पटोलेंना सहकार्य करू

दरम्यान,  यापुढे आपण भाजपच्या कोणत्याच कार्यक्रमात हजर राहणार नाही, अशी विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली. सोबतच, साकोली विधानसभा मतदारसंघात परिणय फुके रिंगणात आहेत. नाना पटोलेंच्या पराभवासाठी फुके काम करीत आहेत, त्यामुळे वेळप्रसंगी साकोली मतदारसंघात नानाभाऊंना सहकार्य करु असे वाघमारे यांनी म्हटले आहे.  तसेच, “आपल्याला बाहेरची पार्सल बाहेर पाठविण्याचा संकल्प करायचा आहे”, असे त्यांनी सभेत बोलून राग व्यक्त केला.

देशातील सर्वात मोठी कर्जमाफी भाजपच्या काळात : मुख्यमंत्री फडणवीस

● द्वेष्टेपोटी माझ्यावर खोटे आरोप : डाॅ.परिणय फुके

दुसरीकडे, आमदार वाघमारे यांनी लावलेले आरोप हे द्वेष्टेपोटी असून ते खोटे असल्याचे पालकमंत्री परिणय फुके यांनी म्हटले आहे. “कार्यकर्त्यासोंबत संवाद साधताना चरण वाघमारे यांनी आपल्यावर केलेले आरोप हे व्देषापोटी केले असून, त्यांच्या विनयंभग प्रकरणात अडकण्याशी आपला तिळमात्र संबंध नाही”, असे फुके म्हणाले आहे. सोबतच, आमचा भाजप पक्ष हा महिलांचा सन्मान राखणारा पक्ष असल्याचे, भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ.परिणय फुके यांनी म्हटले असल्याचे, वृत्त बेरार टाईम्स या स्थानिक वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे.

सोबतच, “विनयभंगाच्या आरोपात अडकल्यानेच पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली, मात्र तो रोष माझ्यावर दाखवून समाजात भ्रम निर्माण केला जातो आहे”,  असे फुके यांनी म्हटले आहे. तसेच, जर या प्रकरणात न्यायालयातून ते निर्दोष सुटले, तर आमचा पक्ष भविष्यात त्यांचाही विचार करेल, असेही ते म्हणाले.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: