Site icon MarathiBrain.in

आर हरी कुमार यांनी स्वीकारला नौदल प्रमुखाचा पदभार!

ब्रेनवृत्त । नवी दिल्ली


ऍडमिरल आर. हरी कुमार यांनी काल (मंगळवारी) भारतीय नौदल प्रमुखाचा (Chief of Naval Staff) पदभार स्वीकारला. नौदलाचे मावळते नौदल प्रमुख करमबीर सिंह यांच्याकडून त्यांनी या पदाची सूत्रे हाती घेतली. नवी दिल्लीतील नौदल मुख्यालयात याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात नव्या नौदल प्रमुखांना मानवंदना देण्यात आली. 

ऍडमिरल आर. हरी कुमार यांना नौदल प्रमुखपदी नियुक्तीपूर्वी ‘गार्ड ऑफ ऑनर’ या सन्मानानेही गौरविण्यात आले आहे. नौदल प्रमुख म्हणून पदभार नियुक्ती पूर्वी ते व्हाईस अ‍ॅडमिरल पदावर कार्यरत होते. नौदल प्रमुख पदाचा पदभार स्वीकारताना आर. हरी कुमार भावूक झाल्याचे दिसत आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या आईच्या पायांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि मिठी मारली.

यावेळी त्यांच्या आईच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वाहत होता. पदभार स्विकारण्याच्या कार्यक्रमात त्यांनी देशाच्या समुद्रीसीमांच्या सुरक्षेवर आणखी भर देऊन देशाचे संरक्षण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे म्हटले. 

वाचा । तटरक्षक दलाच्या ‘सचेत’ जहाज व दोन आंतररोधी नौकांचे जलावतरण

> कोण आहेत आर हरी कुमार

ऍडमिरल कुमारच्या सागरी कमांडमधील तैनातींमध्ये भारतीय नौदल जहाज (INS) निशंक, क्षेपणास्त्र-सुसज्ज लढाऊ जहाज INS कोरा आणि मार्गदर्शित-क्षेपणास्त्र विनाशक INS रणवीर यांचा समावेश आहे. त्यांनी भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौका INS विराटचेही नेतृत्व केले आहे. त्याचबरोबर वेस्टर्न फ्लीटचे फ्लीट ऑपरेशन्स ऑफिसर (FOC) म्हणूनही काम पहिले आहे. 

लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे नवे लष्करप्रमुख !

वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये एफओसीचा पदभार स्वीकारण्यापूर्वी ते मुख्यालयात इंटिग्रेटेड स्टाफ कमिटी आणि इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे प्रमुख होते. ऍडमिरल कुमार यांनी नेव्हल वॉर कॉलेज, यूएस, आर्मी वॉर कॉलेज, महू आणि रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज, यूके येथून अनेक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. त्यांना परम विशिष्ट सेवा पदक (PVSM), अति विशिष्ट सेवा पदक (AVSM) आणि विशिष्ट सेवा पदक (VSM) देण्यात आले आहेत.

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा  www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.in

Exit mobile version