Site icon MarathiBrain.in

बॅनर्जींवर टीका करणारे द्वेषाने आंधळे : राहूल गांधी

अभिजित बॅनर्जींवर टीका करणारे अंधभक्त हे द्वेषाने आंधळे झाले असल्याची टीका यांनी केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी नुकत्याच केलेल्या विधानाला गांधींनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली

नुकतेच ‘विकास अर्थशास्त्र’ क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी ‘नोबेल पुरस्कार’ जाहीर झालेल्या अभिजित बॅनर्जी यांच्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अंधभक्त द्वेषाने आंधळे झाले असून, त्यांना अभिजित बनर्जींनी केलेल्या कामाची किंमत नसल्याचे, राहूल यांनी म्हटले आहे.

भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना नुकताच नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यासंदर्भात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अभिजीत बॅनर्जी हे डाव्या विचारसरणीचे असल्याची टीका केली होती. “नोबेल जाहीर झाल्याबद्दल मी अभिजीत बॅनर्जी यांचे अभिनंदन करतो. बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या ‘न्याय’ या दारिद्र्य निर्मूलन योजनेला पाठिंबा दर्शवला असून, ते पूर्णतः डाव्या विचारसरणीचे आहेत. बॅनर्जी यांची विचारसरणी भारतीयांनी नाकारली आहे” असा दावा गोयल यांनी केला आहे.

कोशिकांच्या प्राणवायू ग्रहणावरील संशोधनासाठी यंदाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर

दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी गोयल यांच्या विधानाला चांगलेच प्रत्युत्तर आहे. “हे अंधभक्त द्वेषाने आंधळे झाले असून, त्यांना प्रोफेशनालिझम काय असते हे माहिती नाही. त्यांना ते समजावण्यासाठी कितीही दशके लागली, तरी ते समजणार नाहीत. पण बॅनर्जी यांनी खात्री बाळगावी की कोट्यवधी भारतीय त्यांच्यासोबत आहेत” असे राहूल गांधी म्हणाले.

सोबतच, कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही यासंबंधी भाष्य करत भाजपवर ताशेरे ओढले आहेत. प्रियांका म्हणाल्या की, भाजपा नेत्यांना जे काम मिळाले आहे, ते करायचे सोडून दुसऱ्यांच्या कर्तृत्वाला खोटे ठरवण्यात ते व्यस्त आहेत.” तसेच, “नोबेल विजेत्यांनी आपले काम योग्यरित्या करून नोबेल मिळवले आहे. भारतीय अर्थव्यवस्था कोलमडत असताना, तुमचे काम तिला सुधारण्याचे आहे, कॉमेडी सर्कस करण्याचे नाही”, असेही त्या म्हणाल्या.

 

◆◆◆

Exit mobile version