आखाती हिंदूंना धमकवणाऱ्यांना पाकिस्तानात पाठवणार : भाजप प्रवक्ते गोपालकृष्णन

ब्रेनवृत्त, केरळ

आखाती देशांत वास्तव्यास असलेल्या हिंदूंना धमकावणाऱ्या लोकांना पाकिस्तानात पाठवले जाईल, असे वक्तव्य केरळमधील भाजपा प्रवक्ता बी. गोपालकृष्णन यांनी केले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यासंबंधी बोलताना गोपालकृष्णन यांनी हे वक्तव्य केले. तसेच, जर केरळ राज्य सरकारने एनपीआर लागू केले नाही, तर राज्याला स्वस्त धान्य पुरवठा (रेशन) मिळणे बंद होईल, असेही गोपालकृष्णन म्हणाले.

छायाचित्र स्रोत : द इंडियन एक्सप्रेस

सुधारित नागरिकत्व कायद्याचे समर्थन करणाऱ्या आखाती देशांमधील हिंदू लोकांना काहीजण धमकी देत असल्याचा आरोप केरळमधील भाजपचे प्रवक्ते बी. गोपालकृष्णन यांनी केला आहे. “इंडियन युनिअन मुस्लीम लीगने जातीय घटकांना दूर केले आहे. नागरिकत्व कायद्याचे समर्थन करणाऱ्या आखाती देशातील हिंदूंना काही लोक धमकावत आहेत. अशा लोकांना पाकिस्तानात जाण्यास भाग पाडलं जाईल” असे त्यांनी म्हटले आहे.

देशात कायद्यापेक्षा राजकीय सूडबुद्धी वरचढ : डी. के. शिवकुमार

बहारीन येथे एका केरळमधील हिंदू नागरिकाने नव्या कायद्याचे समर्थन केल्याने त्याच्या मालकीच्या हॉटेलला टार्गेट करण्यात आले असल्याचे गोपालकृष्णन यांनी सांगितले. यासंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. ज्यामध्ये केरळमधीलच काही लोकांना मालकाच्या विरोधात हॉटेलमध्ये घोषणबाजी करताना दाखवण्यात आलं होतं. सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन केल्यामुळे हा निषेध करण्यात आला होता.

बॅनर्जींवर टीका करणारे द्वेषाने आंधळे : राहूल गांधी

दरम्यान, केरळ राज्य सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीच्या (एनपीआर) प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर गोपालकृष्णन यांनी नाराजी व्यक्त करत रेशन बंद करण्याची धमकी दिली आहे. मुख्यमंत्री पी. विजयन यांना एनपीआर प्रक्रिया लागू करावीच लागेल. असे नाही झाले, तर सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत राज्याला रेशन मिळणे बंद होईल, असे गोपालकृष्णन यांनी म्हटले आहे. mathrubhumi

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: