प्रियंका यांनी स्वतःचे नाव ‘फेरोज गांधी’ करावे : साध्वी निरंजन ज्योती

एएनआय, लखनऊ

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सोमवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी निशाणा साधला होता. त्यास प्रत्युत्तर म्हणून केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज प्रियंका यांना टोला लगावला आहे. प्रियंका गांधी यांनी स्वतःचे नाव बदलून फेरोज प्रियंका करावे, असे त्या म्हणाल्या आहेत.

केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर नावावरून टीका केली आहे. “प्रियंका भगव्या रंगाचा अर्थ समजू शकत नाहीत कारण त्या खोट्या गांधी आहेत. त्यांनी आपल्या नावातून गांधी हटवून, ‘फिरोज प्रियंका’ असे नाव ठेवावे”, असे साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या. तसेच, नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या मागे प्रियांका गांधी यांच्या हात असेल, तर त्यांनी समोर यावे असे आवाहनही साध्वी यांनी केले आहे. त्या म्हणाल्या, “उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारांविरोधात सुरू असलेल्या कठोर कारवाईमुळे प्रियंका गांधी यांना योगी सरकारचा त्रास वाटत आहे. जर दंगली करणाऱ्यांच्या मागे त्या असतील, तर त्यांनी समोर यावे व तसे स्पष्ट करावे.”

बॅनर्जींवर टीका करणारे द्वेषाने आंधळे : राहूल गांधी

तसेच, प्रियंका गांधी यांनी भगव्याबाबत अधिक अभ्यास करण्याची गरज असून, भगवा रंग हा ज्ञान व आत्मियतेचे प्रतिक असल्याचेही त्या म्हणाल्या. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनात हिंसाचार उसळला होता, त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल प्रियंका गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. मुख्यमंत्र्यांच्या सूडबुद्धीच्या आधारे उत्तरप्रदेश पोलीस आणि प्रशासन कारवाई करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

“७७ वर्षीय माजी पोलीस अधिकारी दारापुरी यांच्या अटकेविरोधात आम्ही राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे तक्रार केली आहे. जे भगवे वस्त्र परिधान करतात, ते आम्हाला शांती आणि करूणा शिकवतात. पण, सूडबुद्धीने वागायचे शिकवत नाहीत”, असेे म्हणत गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांंच्यावर टीका केली होती.

 

◆◆◆

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: