Site icon MarathiBrain.in

मला अपमानीत झाल्यासारखे वाटते : कॅप्टन अमरिंदर सिंग

ब्रेनवृत | पंजाब


पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा आज (शनिवार) राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यातील पक्ष नेतृत्त्वाच्या निर्णयांवर नाराजी व्यक्ती केलो आहे. “मला अपमानीत झाल्यासारखे वाटत आहे”, असे कॅप्टन सिंग म्हणाले आहेत. पक्षांतर्गत गटबाजीचे राजकारण व पक्षाच्या आमदारांच्या नियोजित बैठकीच्या आधीच त्यांनी राजीनामा दिला.

“पक्ष नेतृत्व व काही आमदारांनी माझ्याशी ज्याप्रकारे चर्चा केली, त्यावरून मला अपमानित झाल्यासारखे वाटते. मी आज सकाळीच पक्षाध्यक्षांशी (सोनिया गांधी) बोललो आणि  राजीनामा देणार असल्याचे त्यांना सांगितले”, असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांना सांगितले.

राज्यातील पक्षाचे कार्यकर्ते व नेतृत्त्व यांविषयी आपल्या भावना व्यक्त करताना ते पुढे म्हणाले, “अलीकडच्या काळातील आमदारांची होणार असलेली ही तिसरी बैठक आहे, त्यामुळे मी राजीनामा देण्याचे ठरवले. मी काँग्रेसमध्येच आहे. मी माझ्या समर्थकांशी सल्लामसलत करेल आणि पुढील वाटचाल ठरवू.” 

ब्रेनबिट्स : कोण आहेत कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई?

मुख्यमंत्री सिंग यांनी आज आपला राजीनामा राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे सोपवला. मंत्रीमंडळासह मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्याचे मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रवीन ठक्राल यांनी ट्विटरकॅप्टन वरून जाहीर केले.

“मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांची भेट घेतली व मुख्यमंत्री पद तसेच मंत्रीमंडळाचा राजीनामा त्यांच्याकडे सोपवला. थोड्याच वेळात ते राजभवनाच्या द्वाराकरून माध्यमांना याविषयी संबोधित करतील”, असे ठक्राल यांनी ट्विटले आहे.

अन् राहुल निघाले ट्रॅक्टर घेऊन संसदेकडे !

१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्ध काळात कॅप्टन राहिलेले अमरिंदर सिंग यांनी २०१७ मध्ये बहुमत प्राप्त असलेल्या काँग्रेस पक्षाकडून पंजाबचे २६ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. २०१० ते २०१३ या काळात ते पंजाब प्रदेश काँग्रेस समितीचे (PPCC) अध्यक्षही राहिले आहेत. कॅप्टन सिंग पंजाब विधानसभेवर पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.in

Exit mobile version