आता दिवसाला फक्त ₹२० हजार; एसबीआयचा नवा निर्णय

भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला २० हजार रुपयेच रोख काढता येणार असल्याचा नवा निर्णय बँकेने जाहीर केला आहे.

 

मुंबई , १ ऑक्टोबर

देशातील सर्वात मोठी व सर्वसामान्यांचा सर्वात मोठा आधार असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने दैनंदिन रोखेव्यवहारावर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या एटीएममधून ३१ ऑक्टोबरपासून दरदिवशी फक्त २० हजारच रुपयेच काढता येणार आहेत.

Pic Source

भारतीय स्टेट बँकेने दरदिवशी काढण्यात येणाऱ्या रोख रकमेच्या मर्यादेमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ३१ ऑक्टोबरपासून एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून दररोज फक्त २० हजार रुपयेच काढता येणार आहेत. सध्या ही मर्यादा दररोज ४० हजार रुपयांची आहे. या निर्णयाविषयीचे आदेश भारतीय स्टेट बँकेने आपल्या शाखांना पाठवले आहेत. यात म्हटले आहे की, एटीएमच्या रोख रक्कम काढण्याच्या व्यवहारात होणाऱ्या फसवणुकीच्या वाढत्या तक्रारी आणि रोखरहीत व्यवहारांचे प्रमाण वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आदेशात असेही सांगितले आहे की, मेस्ट्रो आणि क्लासिक डेबिड कार्डमधून रक्कम काढण्याची मर्यादाही घटवण्यात आली आहे.  हे सर्व नियम ३१ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: