अंजु बॉबी जॉर्जची लांब उडी; ठरली ‘वुमन ऑफ द इयर’!

मराठीब्रेन ऑनलाईन

 ब्रेनवृत्त । लॉसने (स्वित्झर्लंड)


भारताची जगप्रसिद्ध धावपटू अंजु बॉबी जॉर्ज यांना जागतिक स्तरावर मोठ्या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. जागतिक ऍथलेटिक्सने (World Athletics) जॉर्जला त्यांच्या भारतातील क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी तसेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी अधिकाधिक महिलांना प्रेरित केल्यामुळे ‘वुमन ऑफ द इयर’ म्हणून गौरवले आहे. अंजु बॉबी जॉर्ज ऍथलेटिक्समधील अतुलनीय योगदानामुळे यंदाचा वर्षाच्या पुरस्कारासाठी पात्र ठरली आहे.

भारताची माजी आंतरराष्ट्रीय लांब उडी क्रीडापटू अंजु बॉबी जॉर्ज अजूनही या क्रीडाप्रकारात सक्रियपणे सहभागी आहे. सन 2016 मध्ये अंजुने तरुण मुलींसाठी प्रशिक्षण अकादमी उघडली आहे. तिच्या या अकादमीने आधीच जागतिक स्तरावर U20 पदक विजेते तयार करण्यात मदत केली आहे.

नक्की वाचा । ‘नीरज’ने फुलवले भारताचे ‘सुवर्णकमळ’!

सोबतच, भारतीय ऍथलेटिक्स महासंघाच्या (IAF) वरिष्ठ उपाध्यक्षाच्या भूमिकेत अंजुने खेळांमध्ये लैंगिक समानतेसाठी सतत आवाज उठवला असून, शालेय विद्यार्थिनींना खेळात भविष्यातील नेतृत्व पदासाठी मार्गदर्शन केले आहे. जॉर्जच्या याच अतुलनीय कामगिरीसाठी तिला ‘वुमन ऑफ द इयर’चा पुरस्कार मिळाला.

दुसरीकडे, टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजेत्या राहिलेल्या जमैकाच्या इलेन थॉम्पसन-हेरा आणि नॉर्वेच्या कार्स्टन वॉरहॉम यांना ‘२०२१ मधील सर्वोत्कृष्ट ऍथलीट्स’ (World Athletics of the Year) म्हणून गौरवण्यात आले आहे.  जागतिक ऍथलेटिक्सतर्फे बुधवारी आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक ऍथलेटिक्स पुरस्कार २०२१ या समारंभात या क्रीडापटूंच्या नावांची घोषणा करण्यात आली.

हेही वाचा । भारताने ८व्यांदा जिंकले सॅफ अजिंक्यपद; सुनील छेत्रीची मेस्सीशी बरोबरी!

थॉम्पसन-हेराने या वर्षी ऑलंपिकच्या इतिहासातील सर्वोत्तम स्प्रिंट मारली. तिचे ऑलम्पिकमधील 100m आणि 200m चे विजेतेपद तिने टोकियो ऑलिम्पिकमध्येही कायम ठेवले आणि 4x100m रिलेमध्ये तिसरे सुवर्णपदकही आपल्या खात्यात जोडले. सोबतच, या ऑलम्पिकमध्ये तिने 100m आणि 200m प्रकारात अनुक्रमे 10.54 आणि 21.53 अशी जागतिक आघाडीची वेळ नोंदवली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: