आयसीसी क्रमवारीत कोहलीची घसरण; पराभवाचा मोठा फटका!

मराठी ब्रेन ऑनलाईन 

ब्रेनवृत्त । दुबई 


काल (बुधवारी) जाहीर झालेल्या आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय फलंदाज्यांच्या (पुरुष) क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानावर घसरला आहे. सद्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत कोहलीने पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावले असले, तरी जागतिक क्रमवारीत विराट कोहली एका स्थानाने खाली आलेला आहे. सोबतच भारतीय फलंदाज केएल राहुल आठव्या क्रमांकावर घसरला आहे.

आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय फलंदाजीच्या (पुरुष) क्रमवारीत इंग्लंडचा डेव्हिड मलान 831 गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर 820 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे. विशेष म्हणजे, दक्षिण ऑफ्रिकेच्या मार्करामने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यांत नाबाद 40 आणि 51 धावा करत कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग गाठली आहे. तब्बल आठ स्थानांनी झेप घेत मार्करामने क्रमवारीत तिसरे स्थान पटकावले. 

अबब! कोटींच्या बोलीसह आयपीएलमध्ये दोन नव्या संघांचा समावेश!

रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सुपर १२ सामन्यात भारताचा १० गडी राखून पराभव झाला होता. या सामन्यात कोहलीने (७२५ रेटिंग गुण) ४९ चेंडूत अर्धशतक केले, तर राहुलने (६८४) तीन धावा केल्या होत्या. याचा फटका दोघांच्याही क्रमवारीवर बसला आहे. क्रमवारीत विराट पाचव्या स्थानावर व केएल राहुल आठव्या क्रमांकावर आहे.  

दुसरीकडे, पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान तीन स्थानांनी पुढे जात चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी आहे. मंगळवारी त्याने भारताविरुद्धच्या सामन्यात नाबाद ७९ आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दुसऱ्या विजयात ३३ धावांसह रिझवानने हे मानांकन मिळवले.

आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या यादीत टॉप नऊमध्ये सर्व फिरकीपटूंचा समावेश आहे. बांग्लादेशचा स्टार खेळाडू शाकिब अल हसनने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

आमच्या टेलिग्राम वाहिनीत सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी www.marathibrain.in सोबत जुळून रहा ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: