आमच्याविषयी

नमस्कार, मराठी ब्रेनच्या वाचकांचे आम्ही मनापासून स्वागत करतो.

नियमित व सतत नवे काहीतरी शिकण्याची आवड असणाऱ्या एका जिज्ञासू तसेच चोखंदळ वाचकाला सेवा, माहिती व वाचनखाद्य पुरवणाऱ्या संबंधित माध्यमाची माहिती नक्कीच असायला हवी, किंबहुना ती माहित असणे त्यांचा अधिकारच आहे.

आज वर्तमानात माहितीचा ओघ व प्रसारमाध्यमांची अफाट गतीने वाढ होत आहे. यांत्रिकीकरण, आधुनिक माहिती तंत्रज्ञान, आंतरजाल, डिजिटलीकरण व संबंधित अनेक अद्ययावत प्रणालींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम माध्यमांवर पडतो आहे आणि कालानुरूप अनेक माध्यमे, त्यांचे धोरण, तत्त्व, ध्येयही हे बदलू लागली आहेत. मात्र, पत्रकारिता असो वा माहिती आदानप्रदानाचे इतर माध्यम असो, त्यातील तत्त्वे, कार्यपद्धती व भूमिका ह्या कुणाच्याही प्रभावाखाली न येता निष्पक्ष व निर्भीड पद्धतीच्या असायला हव्यात. दरम्यान, मराठी पत्रकारितेची हीच मुलभूत तत्त्वे व माहिती संप्रेषणाची मूलतत्त्वे अंगभूत मानून नव-संकल्पनांसह व दृढतेने वाचकांच्या सेवेसाठी, लोकमानसासाठी व जनशिक्षणासाठी उभारलेले ‘मराठी ब्रेन’ हे एक सर्वांसाठीचे अभिनव तसेच अभूतपूर्व उपक्रम व अभिव्यक्ती व्यासपीठ आहे.

‘मराठी ब्रेन’ (www.marathibrain.in) हे मराठी भाषेतील माहिती व विश्लेषणात्मक पत्रकारितेचे एकमेव ई-व्यासपीठ अथवा संकेतस्थळ आहे. हे व्यासपीठ सर्वांसाठी खुले असून, सर्वांच्या अभिव्यक्ती, मत व आवाजाला एकसमान लेखणारे व समान न्याय देणारे आहे. बातम्या, विविध घडामोडी, त्यांचे विश्लेषण, ज्ञानवर्धक मजकूर, मतमतांतरे, अभिनव उपक्रम, मराठी भाषेशी व महाराष्ट्राशी संबंधित नवसंकल्पना, तसेच साहित्य (लेख, ललित, कथा, कविता, पुस्तक परीक्षण व इतर लिखाण) आदी प्रकाशित करणे ‘मराठी ब्रेन’चे एक मुख्य उद्दिष्ट आहे. अधिक वाचा : आमचे धोरण

सोबतच, पत्रकारितेच्या गुणधर्मांसह संयुक्त असलेले ‘मराठी ब्रेन’ हे मराठीतील एक लोकप्रिय अभिव्यक्ती व्यासपीठसुद्धा आहे. त्यामुळे, येथे ‘मराठी ब्रेन’च्या संदर्भात अभिप्रेत असल्याप्रमाणे ‘विश्लेषणात्मक पत्रकारिता’ म्हणजे ‘पत्रकारितेची एक अशी अभिनव व बृहद शाखा ज्यामध्ये फक्त प्राप्त बातमी अथवा घडामोडीच्या वृत्तांकनावर अवलंबून न राहता त्या बातमीचे सखोल विश्लेषण, घटनेचे विविध पैलू, त्यावर टीका आणि अंदाज व प्रामाणिक परीक्षणाचे वृत्तांकन करणे, इत्यादी. अंतर्भूत आहे. ‘माहिती पत्रकारिता’ म्हणजे ‘जागतिक, राष्ट्रीय व स्थानिक पातळीवर घडणाऱ्या विविध घडामोडींची सखोल माहिती, शासन-प्रशासन पातळीवर व विविध आस्थापनांद्वारे जाहीर होणारे उपक्रम, योजना, प्रकल्प, सेवा-सुविधा, निर्णय, सांखिकी, अहवाल, पाहणी, आदींची इत्यंभूत माहिती तसेच मानवी समाज व वाचकवर्गाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहितीचा वाचकांपर्यंत प्रसार व पुरवठा करणारी पत्रकारितेची शाखा.’ वाचा : मराठी ब्रेनची कार्यपद्धती व संकेत 

वर उल्लेख केलेल्या सगळ्या बाबींसह एक स्वतंत्र, निरपेक्ष, निर्भीड, निष्पक्ष, सर्वसमावेशक व भेदभावरहित वृत्त, माहिती व वाचनसेवा पुरवण्यास मराठी ब्रेन प्रयत्नरत व कटिबद्ध आहे. ‘मराठी ब्रेन’ कोणत्याही राजकीय व सामाजिक पक्ष अथवा संघटनेच्या दडपणाखाली काम करत नाही किंवा कोणत्याही विशिष्ट विचारसरणीचा प्रसार-प्रचार करत नाही. मराठी ब्रेनला कोणत्याही सद्या कोणत्याही स्वरुपात अनुदान मिळत नाही किंवा विनाकरार अथवा गैरव्यवहाराच्या स्वरुपात निधी प्राप्त नाही. हे एक स्वतंत्र व वाचकांच्या प्रेमावर उभे असलेले व्यासपीठ आहे. वाचा : गोपनीयता धोरण

‘मराठी ब्रेन’ या नावात ‘मराठी’ हा शब्द महाराष्ट्र व मराठी भाषेशी संबंधित असला, तरी ते एका विशिष्ट भाषेशी सलगता बाळगून इतर भाषांचा द्वेष अथवा तिरस्कार निर्माण करत नाही किंवा कुणावर दडपण आणत नाही. अर्थातच, मराठी भाषा समृद्ध करण्यास व तिला बहुआयामी स्वरूप देण्याचे आमचे एक उद्दिष्ट आहे. त्यामुळे आम्ही आमची सेवा जास्तीत जास्त प्रमाणात मराठी पुरवतो. सोबतच, मराठी भाषेतून प्रामाणिक व योग्य माहिती प्रसार करून व पत्रकारितेची खरी व मूलतत्त्वे अंगभूत मानून ‘मराठी ब्रेन’ वाचकांच्या ज्ञानवर्धनासाठी नेहमी सेवेत आहे. तसेच, वाचकांच्या योग्य, प्रामाणिक, सुजाण आणि आम्हाला वृद्धिंगत करतील अशा प्रतिक्रिया व तक्रारींसाठी ‘मराठी ब्रेन’ नेहमी खुले आहे.

 

संपादक

मराठी ब्रेन डॉट इन (www.marathibrain.in)

%d bloggers like this: