आमचे सरकार भाजपच्या दयेने आलेले नाही: पिनरायी विजयन

वृत्तसंस्था

केरळ, २७ ऑक्टोबर

भगवान अयप्पाच्या भक्तांचे आंदोलन दडपून केरळ सरकार शबरीमाला मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. या आरोपावर प्रत्युत्तर म्हणून केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी केरळचे सरकार भाजपच्या दयेवर स्थापन झालेले नाही असे म्हटले आहे.

भगवान अयप्पांच्या भक्तांचे आंदोलन दडपून केरळ सरकार शबरीमाला मंदिरच नष्ट करत असल्याचा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज केला आहे. शबरीमाला मंदिरातील आंदोलनकर्त्यांना वाईट वागणूक दिली जात असून, आंदोलनकर्त्यांना भाजपचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सरकारच्या या वाईट कृत्याच्या विरोधात भाविकांचे आंदोलन सुरु असताना भाजपा, आरएसएस आणि अन्य संघटनांच्या जवळपास २ हजार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. तरीही, आम्ही भाविकांसोबतच उभे राहणार असे अमित शाह कन्नूर येथील सभेत म्हणाले आहेत.

दरम्यान, अमित शाह यांच्या या आरोपांना केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शबरीमाला प्रकरणाच्या मुद्द्यावरून अमित शाह आमचे सरकार पाडण्याची धमकी देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शहा यांनी लक्षात ठेवावे की केरळचे सरकार हे जनतेने निवडून दिले सरकार आहे. ते काही भाजपच्या दयेवर निवडून आलेले सरकार नाही. भाजप प्रमुखाने केलेले आरोप हे असंवैधानिक आहेत, असे विजयने म्हणाले.

मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिरात महिलांची प्रवेशबंदी उठवली आहे. गेल्या आठवड्यात स्त्रियांचे मंदिरात प्रवेश करण्याचे प्रयत्नही सुरू झाले होते, पण मंदिर परिसरात सुरु असलेल्या आंदोलनामुळे अजूनपर्यंत एकही महिला मंदिरात प्रवेश करु शकलेली नाही. स्त्रियांचे मंदिरात प्रवेशाची सुरुवात म्हणून पत्रकार स्त्रियांनी पुढाकार घेतला आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: