“गर्दीतल्या माणसा”
एक छान अशी कविता……!
गर्दीतल्या माणसा रे
एकदाच शेतकरी होवून पहा. . .
भाकरीची ती बांधुन शिदोरी
अनवाणी चालुन पहा. . .
उन्हात चालत राहुन
नांगर हाकलून पहा. . .!
पेरणी साठी कर्ज सावकाराचे
कर्ज १०-२०% टक्के व्याजाने घेवून पहा. . .
सणासुदिला फाटक्या कपडयातल्या पोराबाळाना नव्या कपडयाचे वचन देवून पहा….
थकलेल्या डोळ्यानी वाट पहाणाऱ्या आजारी आई-बाबांना पैश्याअभावी औषधी आणली नाही हे सांगून पहा. . .
फि भरु शकत नाही म्हणून
पोराला शिक्षण घेवू नको असे सांगून पहा..
पोरीच्या लग्नाला हुंडयासाठी
शेती गहांण ठेवून पहा…
एक दाण्याचे हजार दाणे करूनही
एकदा तरी उपाशी राहून पहा
श्वास अखेरचा घेताना फक्त
काळ्या मातीलासलाम करून पहा. . .
गर्दीतल्याच माणसा रे
एकदाच शेतकरी होवून पहा. . .
गर्दीतल्या माणसा रे
शेतीसाठीच आयुष्याची माती एकदाच करून पहा….!
दिलीप डाळीमकर (शेतकरीपुत्र)
@DDalimkar