गुटखा एक फॅशन!
गुटखा एक फॅशन
संगतीचे व्यसन
पंगतीचे जशन
मनवितो गुटखा!
घश्याचे विकार
शरीराला बेकार
जगण्यास नकार
देतो गुटखा!
जीवनाची घात
आयुष्याची पात
लावलेली वात
विझवितो गुटखा!
सरीता जीवन
खालल्याचे कारण
अखेरचे सरण
रचतो गुटखा !
दिलीप नारायणराव डाळीमकर(शेतकरीपुत्र)
Twitter: @DDalimkar