गैरमार्गाने खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपन्यांवर येणार बंदी!

विना परवाना धारक घरपोच खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपन्यांना अन्न व औषध प्रशासनाने व्यवसाय बंद करण्याचे नोटीस जाहीर केले आहे.

 

पुणे, 10 आॅक्टोबर

अनुप्रयोगाच्या (अॅप्लिकेशन) माध्यमातून विनापरवाना खाद्यपदार्थ विकणाऱ्या ११३ कंपन्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाने व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. ही माहिती अन्न आणि औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांना दिली आहे.

राज्य अन्न आणि औषध प्रशासनाने गैरमार्गानी व्यवसाय करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्या कंपन्यांना त्यांचे व्यवसाय बंद करण्याचे नोटीस बजावले आहेत. गैर व्यवहारांशी संबंधित सर्व कंपन्या स्विगी, झोमॅटो, फुडपांडा आणि उबर इट्स या कंपन्यांशी संलग्न आहेत. यांच्याविरुद्ध कारवाई केल्याची माहिती देताना बापट म्हणाले की, ऑनलाईन खरेदी विक्रीच्या क्षेत्रात आता अन्नपदार्थही ऑनलाईन पद्धतीने मिळण्यास सुरूवात झाली आहे.  काही कंपन्या अॅप आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून शासनाची परवानगी न घेता खाद्य पदार्थ पुरवत होत्या. यातील काही कंपन्या पदार्थांचा ताजेपणा जपत नाही, तर भेसळयुक्त पदार्थ विकत असल्याचे दिसून येते. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे आणि अन्न व औषध प्रशासन दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम राबविण्यात आली. बृहन्मुंबई विभागात तब्ब्ल ११३ आस्थापना अशा पद्धतीने गैरव्यवहार करत असल्याचे दिसून आले आहे. यातल्या अनेक कंपन्या घरपोच सेवा देत होत्या, मात्र त्यांनी खाद्यपदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण आणि परवाने घेतले नसल्याचे तपासणीमध्ये आढळून आले आहे. अशा सर्व कंपन्यांना सर्वांना नोटीस देण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात त्यांच्यावर व्यवसाय बंदीची कारवाई केली जाईल, असेही बापट म्हणाले.

 

◆◆◆

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: