न्या. नरेश पाटील मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती
मुंबई, २५ ऑक्टोबर
मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नरेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते उच्च न्यायालयाचे ४२ वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून आजपासून पदभार सांभाळतील.
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायाधीश नरेश हरिश्चंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 13 ऑगस्ट 2018 पासून मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कामकाज पाहात होते. काही दिवसांपूर्वी कॉलेजियमने नरेश पाटील यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.
● न्यायमूर्ती नरेश पाटील:
१. सन 1979 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली.
२. त्यानंतर फौजदारी व दिवाणी प्रकारच्या विविध खटल्यात त्यांनी ववकिली केली. एएसजी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात भारत सरकारची बाजू मांडण्याचेही काम त्यांनी केले आहे.
३. सन 2001 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून निवड करण्यात आली.
४. 5 डिसेंबर 2017 रोजी डॉ. मंजुला चेल्लूर निवृत्त झाल्यानंतर डॉ. विजया कापसे-तहिलरमानी यांच्याकडे मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यभार सोपवण्यात आले होते. त्यांची मद्रास उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश पदावर नियुक्ती झाल्यानंतर नरेश पाटील यांच्याकडे प्रभारी मुख्य न्यायमूर्तीचे कार्यभार देण्यात आले होते.
◆◆◆