पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर
संयुक्त राष्ट्रातील सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘पॉलिसी लिडरशीप’ या वर्गातून मोदींना हा पुरस्कार देण्यात आला. मोदींसह फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मेक्रॉन यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ ‘ हा पुरस्कार ‘इंटरनॅशनल सोलर अलायंस’ आणि पर्यावरण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्यासाठी दिला जातो. पर्यावरण क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल उचलल्यामुळे मोदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मागील आठवड्यात संयुक्त राष्ट्रासंघाने या पुरस्काराची घोषणा केली होती.
UN chief #AntonioGuterres presents 'UNEP #ChampionsOfTheEarth' award to PM #NarendraModi https://t.co/WB4Wiil43j pic.twitter.com/P43kAQYoRn
— DNA (@dna) October 3, 2018
यासोबतच केरळमधील कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्णत: सौरऊर्जेवर कार्यरत असणारे देशातील पहिले विमानतळ आहे. सततपोषनिय ऊर्जा (सस्टेनेबल एनर्जी) क्षेत्रातील गतिमानतेसाठी दूरदृष्टी दाखविल्याबद्दलचा हा पुरस्कार आहे.
◆◆◆