रामदेव बाबा विकू शकतात ३० रुपयांत ‘पेट्रोल’ ?
शासनाने जर मला पेट्रोल-डिझेलवर कर सवलत दिली, तर मी पेट्रोल डिझेल ३०-४० रुपये प्रतिलिटर या दराने ग्राहकांना विकू शकतो, असे प्रचंड आश्वासक विधान पतंजलीचे संस्थापक रामदेवबाबा यांनी केले आहे. ते एका बैठकीत उपस्थित असताना बोलत होते.
एनडिटीव्हीच्या युवक परिषदेत बोलताना रामदेवबाबा म्हणाले की, “जर शासनाने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरील करावर मला सवलत दिली, तर सध्या असलेल्या दराच्या अर्ध्या दरात मी नागरिकांना इंधन विकू शकतो. मी पेट्रोल- डिझेल ३०-४० रुपये प्रतिलिटर या दराने ग्राहकांना विकू शकतो.” पुढे ते असेही म्हणाले की, “शासनाने पेट्रोल- डिझेलला जीएस्टीमध्ये समाविष्ट करावे, मात्र २८टक्के हा दर सोडून इतर वर्गवारीत समाविष्ट करावे.”
एकीकडे इंधनाच्या दरवाढीला शासनही योग्य ते उपाय शोधू शकलेली नाहीये आणि दुसरीकडे काही व्यक्ती इंधन दरवाढीवर आश्चर्यकारक वक्तव्य करत आहेत. त्यांतील हे एक प्रचंड आशादायी विधानच म्हणावे लागेल. भाजप समर्थक असल्याचे दिसून आलेले रामदेवबाबा, वर्तमान इंधनावाढीमुळे पुढील निवडणुकांमध्ये नरेंद मोदींच्या राजकीय करकीर्दीवर निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा विचार करत असावेत.
एकंदरीत जरी हे राजकीय विधान असले तरी, ३०-४० रुपयांत पेट्रोल विक्री करणे रामदेवबाबांना अशक्यप्राय असल्याचे ‘फायनान्सीयल एक्सप्रेस’ या वृत्तपत्राने दर्शवले आहे. रामदेवबाबांच्या या विधानाला उत्तर देताना फायनॅन्सीयल एक्सप्रेसने एक उदाहरण दिले आहे.
जरी केंद्र व राज्य शासन आणि संबंधित डीलर्सनी लोकांनीही पेट्रोलच्या किमतींवर रामदेवबाबांना कर सवलत दिली तरी, दिल्लीत शेवटी पेट्रोलचा दर ४१.४८ रुपये प्रतिलिटर इतका असेल. अर्थात बाबांनी सांगितलेल्या दरापेक्षा जास्तच असेल. म्हणून ते ४०च्या घरात इंधन विक्री करूच शकणार नाही. The Financial Express
स्रोत : ndtv.com
खरंतर, जरी इंधनांच्या मूळ किंमतीच्या १००टक्के कर आकारला जात असला, तरी पेट्रोल आणि डिझेल पूर्णतः करमुक्त करणे शासनालाही अशक्य आहे. कारण –
१) हे इंधन राष्ट्रीय महसुलाचे मुख्य साधन आहे.
२) दुसरीकडे, हवा प्रदूषणाला आळा घालण्यासाठी इंधनावर कर लावणे हा एक आवश्यक पर्याय आहे.
इंधनाचे दर हे प्रभावीरित्या तेव्हाच कमी होऊ शकतात, जेव्हा आपला देश पूर्णतः इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. सध्या भारत एकूण ८० टक्के इंधन इतर देशांकडून आयात करतो.
◆◆◆