‘सर्वोच्च न्यायालयाकडून केरळ पुरग्रस्तांसाठी मदतनिधी जाहीर’
नवी दिल्ली, २१ ऑगस्ट
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून प्रत्येकी २५ हजार रुपये केरळ पूर मदतनिधी म्हणून देण्यात येईल, असे भारताचे मुख्य न्यायाधीश दिपक मिश्रा यांनी सोमवारी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचुड यांच्या खंडपीठापुढे याबाबत सुनावणी केली गेली. ऍटर्नी जनरल के . के. वेणुगोपाल यांनी दक्षिणेकडील राज्यात झालेल्या पूर दुर्घटनेची सुनावणी केल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा खुलासा केला.
आधी प्रसारित झालेल्या वृत्तांनुसार, वेणुगोपाल यांनी याआधी पूरग्रस्तांसाठी एक कोटी रुपये दान केले होते. या दुर्घटनेमुळे जागतिक स्तरावर लक्ष केंद्रित झाले आहे. वर्तमान शतकातील सर्वात वाईट पुराचा सामना यावेळी केरळला करावा लागत आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी शनिवारी पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३५७ पर्यंत पोहचली असल्याचे सांगितले आहे. या जलआपत्तीमुळे सुमारे १९,५१२ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे .
याआधी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी स्थानिक क्षेत्र विकास निधीतून केरळ पुरग्रस्तांसाठी मदतनिधी जाहीर केला आहे. एमपीएलएडीएस
( एएनआय)
◆◆◆