ब्रेनवृत्त | पुणे
अतिशय तीव्र तापमान परिस्थितीमुळे (उष्ण किंवा थंड) जगभरात दरवर्षी ५० लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडतात, असे एका २० वर्षांच्या कालावधीवर केलेल्या अभ्यासातून निदर्शनास आले आहे. दरवर्षी जगभरात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ९.४% मृत्यू अतिशय उष्ण किंवा थंड तापमानाशी संबंधित असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
जगभरातील विविध भागांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या परिसरातील इष्टतम तापमानात झालेल्या बदलावर करण्यात आलेल्या एका अभ्यासाचा अहवाल दि लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ या नियतकालिकेत प्रकाशित नुकताच प्रकाशित झाला आहे. या अभ्यासानुसार, जगभरात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ९.४% मृत्यू अतिशय उष्ण किंवा थंड तापमानाशी संबंधित आहेत. अर्थात, यामुळे वैश्विक पातळीवर प्रति एक लाख लोकांमागे होणाऱ्या मृत्यूंमध्ये अधिक ७४ मृत्यूंची भर पडली आहे.
ब्रेनविश्लेषण । सन २०७० मध्ये एक तृतीयांश लोकसंख्या असेल अतिउष्ण प्रदेशात !
संबंधित अभ्यासातील सहभागी संशोधकांनी एकूण ४३ देशांमधील ७५० ठिकाणांतील सन २००० ते २०१९ दरम्यान झालेल्या मृत्यूंचे व हवामानाचे विश्लेषण केले. त्यांच्या पाहणीनुसार, वरील प्रदेशांत २० वर्षांच्या कालावधित दैनिक सरासरी तापमानात ०.५२ डिग्री सेल्सियसची भर पडली आहे.
अतिउष्ण तापमानापासून सर्वाधिक मृत्यू पूर्व युरोपमध्ये झाले आहेत, तर उप-सहारा प्रदेशात सर्वाधित मृत्यू अतिशय थंड तापमानामुळे झाले आहेत. या अभ्यासानुसार, गेल्या दोन दशकांत सर्वाधिक मृत्यू उष्ण तापमानापेक्षा थंड तापमानाने झाले आहेत. पण आता हा कल उलट होत असून, उष्ण तापमानाशी संबंधित मृत्यूंमध्ये वाढ होत आहे.
हेही वाचा । लोणार सरोवरातील पाण्याचा रंग बदलला
लोक जरी त्यांच्या राहत्या ठिकाणच्या हवामानाशी अनुकूलित झाले असले, तरीही हवामान बदलामुळे त्यांचे हे अनुकूल विस्कळीत होणार आहे, असे या अभ्यासात म्हटले आहे. या समस्यांना शमविण्यासाठी उपाय म्हणून संशोधकांनी घरांचे योग्य पृथककरण व अधिक सौरचलित वातानुकूलनसारख्या बाबींवर भर दिला आहे.
Join @ मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इत्यादी. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in