दूरसंचार कंपन्यांचे ‘तिहेरी शीत युद्ध’ सुरूच
वृत्तसंस्था, मुंबई
देशातील आघाडीच्या असलेल्या दूरसंचार कंपन्यांपैकी एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दोहोंमधील शीत युद्ध परत चव्हाट्यावर आले आहे. दुसऱ्या नेटवर्कच्या वापरासाठीच्या शुल्कासंबंधी जिओने खेळ मांडल्याचा आरोप एअरटेलने केला आहे. हे प्रकरण समोरील ग्राहकाला जिओवरून जाणाऱ्या रिंगच्या वेळेत करण्यात आलेल्या कपातीसंबंधी आहे.
एअरटेल आणि रिलायन्स जिओ दूरसंचार कंपन्यांमधील वाद पुन्हा समोर आला आहे. दुसऱ्या नेटवर्कच्या संबंधी आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत जिओ नियमबाह्य पद्धतीने कार्य करत असल्याची तक्रार एअरटेलने केली आहे. एअरटेल कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जिओचे नाव न घेता सांगितले की, “एक मोठ्या 4जी कंपनीने मनमानी करत दुसऱ्या नेटवर्कवर केल्या जाण्याऱ्या आऊटगोईंग काँलची रिंग वाजण्याची वेळ कमी केली आहे. यामुळे हा कॉल मिसकॉलमध्ये गणला जातो. मिसकॉल आलेल्या ग्राहकांना त्या नंबरवर पुन्हा कॉल करावा लागत आहे.” यामुळे जिओ नसल्याने इतर नेटवर्कच्या ग्राहकांना याचा फटका बसत आहे, अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
दरम्यान, या आरोपावर स्पष्टीकरण देताना जिओने आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्यासारखे नियम लागू केले असल्याचे म्हटले आहे. जिओने सांगितले की, आम्ही व्होडाफोनसारख्या जागतिक कंपन्या वापरत असलेल्या प्रक्रियेनुसार आऊटगोईंग कॉलची रिंग 20 सेकंद केलेली आहे. कंपनीच्या नेटवर्कवर येणारे बहुतांश कॉल हे मिसकॉल असतात व त्यांचे प्रमाण एक चतुर्थांश आहे. सोबतच, “उलट जिओवरून कॉल मोफत असल्याने अन्य कंपन्यांचे ग्राहक ही मिसकॉलची क्लृप्ती वापरतात. यामुळे जास्तीत जास्त ग्राहक कॉल करण्यासाठी जिओला प्राधान्य देतात” असेही जिओने म्हटले आहे.
जाणून घ्या ५जी तंत्रज्ञानाबद्दल!
दूरसंचार कंपन्यांमध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या नियमानुसार एक करार झालेला असतो. त्यानुसार कॉल करण्यासाठी जर दुसऱ्या नेटवर्कचा वापर केला गेला असेल, तर त्याला मिनिटाला ठराविक रक्कम द्यावी लागते. याला ‘आंतरजोड वापर शुल्क’ (इंटरकनेक्ट युसेज चार्ज) असे म्हणतात. मात्र, जिओने यामध्येच छेडछाड केल्याचा आरोप एअरतटेल कंपनीने केला आहे.
◆◆◆