डोळ्यांखाली सुरकुत्या? हे ५ उपाय ताबडतोब करा!

  चेहऱ्याच्या सौंदर्यासोबतच इतर गोष्टींकडे लक्ष देणंही खूप आवश्यक मानलं जातं जेणेकरून तुम्ही अकाली वृद्ध दिसायला लागू नये. खासकरून जर डोळ्यांबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या वयाचा पत्ता सर्वात आधी डोळ्यांकडे बघूनच लागतो. कारण एका वेळेनंतर तुमचे डोळे खूप निर्जीव आणि थकलेले दिसू लागतात. एवढंच नाही तर ठरावीक वयानंतर तुमच्या डोळ्यांखाली सुरकुत्या दिसू लागतात, ज्या दिसायला खूप वाईट दिसतात.

असं असलं तरी, तुम्ही ठरवलंत तर वेळेआधीच ही समस्या तुम्ही रोखू शकता आणि तारुण्य अबाधित राखू शकता. यासाठी खाली काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत-

अंडे

अंड्यामुळे डोळ्यांखाली पडणाऱ्या सुरकुत्या कमी होतात असं मानलं जातं. पण जेव्हा केव्हा तुम्ही अंडं लावाल तेव्हा त्यातला पिवळा बलक काढून पांढरा भाग लावा. यामुळे त्वचा घट्ट होते.

केळं आणि मध

पिकलेलं केळं चांगलं कुस्करून घेऊन त्यामध्ये काही थेंब मध टाकून डोळ्यांच्या आजूबाजूला लावा. आणि मग अर्ध्या तासाने चेहरा पाण्याने धुवून घ्या.

मसाज करा

बऱ्याचदा त्वचेला नीट रक्ताभिसरण प्राप्त होत नाही आणि त्यामुळे देखील डोळ्यांखाली सुरकुत्या येतात. अशात, तुम्ही एरंडेल तेलाने डोळ्यांच्या खाली मसाज करा यामुळे सुरकुत्यांची समस्या दूर होईल. याव्यतिरिक्त तुम्ही खोबरेल तेलाने देखील मसाज करू शकता. हे तेल रात्रभर तसंच राहू द्या आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी धुवून टाका.

टोमॅटो आणि गुलाबपाणी

टोमाटोच्या रसात काही थेंब गुलाबपाणी मिसळून लावल्याने डोळ्यांखालची काळी वर्तुळं नाहीशी होऊ शकतात. हवं असल्यास गुलाबपाण्यात भिजवलेला कापूस बंद डोळ्यांवर ठेवा. तो ५ ते १० मिनिटं तसाच राहू द्या. या उपायाने तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा तजेलदार होईल.

बटाटा आणि काकडीचा रस

हे मिश्रण त्वचेला मॉइश्चराइझ करायचं काम करते जेणेकरून सुरकुत्या कमी होतात. हे दोन्ही पदार्थ किसून त्यांचा रस काढून घ्या आणि तो डोळ्यांखालच्या सुरकुत्यांवर लावा. यामुळे सुरकुत्या बऱ्याच कमी होतील.

या सगळ्या व्यतिरिक्त जेवढं शक्य होईल तेवढं तणावमुक्त राहा आणि पुरेशी झोप घ्या. यामुळे डोळ्यांखाली सुरकुत्या येणार नाहीत.

वर सांगितलेल्या टिप्सचा वापर करून तुम्ही काही दिवसांतच या समस्येपासून सुटका करून घेऊ शकता!

सौजन्य: जेन पेरेंट

(आम्हाला लिहा: writeto@marathibrain.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: