‘जवाब दो !’

एक स्वप्न पाहिलेले
अंधश्रद्धा निर्मूलन;
याच कारणाकरिता
त्यांनी लादले मरण.

सत्य सांगणे येथे रे
गुन्हा आहे, पाप आहे;
विषारी कट्टरतेचा
मनोमनी साप आहे.

देवासाठी, धर्मासाठी
माणसांना मारतात;
अंधश्रद्धांची श्वापदे
जागोजागी पाळतात.

विझत नाहीत कधी
हे प्रबोधनाचे दिवे;
काळोखाच्या वादळांना
करू द्या रे घाव नवे.

सनातनी, प्रतिगामी
फोफावले कुविचार;
जवाब दो, जवाब दो
हू किल्ड दाभोलकर?


कवी : मिलिंद हिवराळे

        सादिक नगर, बार्शि
        टाकळी, जि. अकोला

भ्र. क्र. ७५०७०९४८८२
ईमेल : milindhiwarale@yahoo.com

◆◆◆(प्रस्तुत लेखात प्रकाशित माहिती आणि विचार हे पूर्णतः लेखकांच्या हक्काधीन असून, इथे प्रकाशित होणाऱ्या लेखांशी व विचारांशी मराठी ब्रेन सहमत असेलच असे नाही.)विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: