Site icon MarathiBrain.in

राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : विरोधकांच्या मुद्द्यांवर निर्णय घ्या!

ब्रेनवृत्त | मुंबई


महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या विविध मुद्यांवर निर्णय घेण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. २३ जून रोजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विरोध पक्षाच्या (भाजप) प्रतिनिधी मंडळाने राज्यपालांची भेट घेऊन, त्यांना दोन स्मरणपत्रे (memorandums) सादर केली होती.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले आहे, की विरोधी पक्षाने उठवलेल्या मुद्यांपैकी तीन विषय अतिशय महत्त्वाचे असून, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घ्यावे आणि त्याविषयी त्यांना कळवावे. फडणवीस यांनी स्मरणपत्रात नमूद केलेल्या मुख्य मुद्यांमध्ये पूढील मुद्यांचा समावेश होता : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचेकालावधी वाढवणे, विधानसभा अध्यक्षांचे रिक्त पद भरणे व ओबीसी आरक्षणाच्या प्रलंबित मुद्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलणे. 

वाचा । भारतीय लोक भाषणबाजीत आघाडीवर : राज्यपाल कोश्यारी

दरम्यान, सत्तेतील महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यपालांच्या या पत्रावर जोरदार टीका केली आहे. “विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा मुद्दा आधीच कार्यान्वित करण्यात आला असून, येत्या ६ जुलैला यासाठी निवडणूक होणे अपेक्षित आहे”, असे काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. राकाँपचे मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांनी त्यांच्या कोट्यातील विधान परिषदेच्या १२ आमदारांची नावे का जाहीर केली नाही? असा प्रश्न केला आहे. 

 

 

हेही वाचा । भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

दुसरीकडे, शिवसेनेचे वरिष्ठ नेते किशोर तिवारी यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर सडेतोड टीका  आहे. “भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे  आहेत की फडणवीस आणि राज्यातील भाजपचे  आहेत?”, असा  केला आहे. जनतेने निवडून दिलेल्या मविआ शासनाच्या कारभारात राज्यपाल कोश्यारी हस्तक्षेप करत व दबाव आणत आले आहेत. राज्याच्या ज्वलंत मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांना विरोधी पक्षाच्या मुद्यांवर लक्ष देण्यात का रस आहे? अशी टीकाही तिवारी यांनी राज्यपालांवर केली आहे. 

तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये राजीनामा दिला होता, तेव्हापासून हे पद रिक्तच आहे. तेव्हपासून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हेच या पदाचा कार्यभार सांभाळून आहेत. दुसरीकडे, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर फक्त दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय शासनाने मागील आठवड्यात घेतला आहे.

 


अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.in ला.

फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.

तुमचे लिखाण, प्रतिक्रिया व सूचना writeto@marathibrain.in वर नक्की पाठवा.

Exit mobile version