राणेंचा जामीन ही शासनाला अजून एक चपराक : चंद्रकांत पाटील

ब्रेनवृत्त । पुणे


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल रात्री उशिरा जामीन मंजूर करण्यात आला. नारायण राणे यांना मिळालेला हा जामीन राज्य शासनासाठी दुसरी चपराक असल्याचे महाराष्ट्राचे भाजप प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

“संघ मंत्री नारायण राणे यांचा जामीन ही राज्य शासनाच्या चेहऱ्यावर लागवलेली दुसरी चपराक आहे. पोलीस आणि गुंडांच्या मदतीने राज्य शासन कारभार चालवत आहे”, असे राज्यातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख चंदक्रांत पाटील एएनआयला म्हणाले.

वाचा । प्राणवायू तुटवड्यामुळे महाराष्ट्रात एकही मृत्यू नाही!

भाजपचे केंद्रीय मंत्री मंडळातील सदस्य असलेल्या नारायण राणे यांना काल दुपारी रत्नागिरीतील चिपळूणमध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी नारायण राणे जेवण करत होते. त्यानंतर कालच रात्री उशिरा महाड येथील स्थानिक न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. तब्येतीत बिघाड असल्याच्या कारणावरून त्यांना जामीन देण्यात आला. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना चपराक लगावण्याच्या नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून राज्यभर शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद पुन्हा पेटून उठला आहे. या घटनेच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. नारायण राणेंनी टीका करताना संयम बाळगायचा होता, असे फडणवीस म्हणाले आहेत.

“नारायण राणेंच्या वक्तव्याचे आम्ही मुळीच समर्थन करत नाही. पण स्वतः मी आणि आमचा संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे”, असे विरोधी पक्षनेते म्हणाले. सोबतच, देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या इतक्या झटपट कार्यवाहीवर शंकाही उपस्थित केली आहे. “मला आश्चर्य वाटत आहे, की हिंदूंना दहशतवादी संबोधणाऱ्या शार्जील उस्मानीच्या विरोधात राज्य शासनाने काहीही केले नाही, पण राणेंच्या बाबतींत अतिशय तत्परता दाखवली आहे”, असे फडणवीस म्हणाले.

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा मराठी ब्रेनसोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: