राणे यांनी बोलताना संयम बाळगायचं होतं : देवेंद्र फडणवीस

ब्रेनवृत्त | मुंबई


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्याच्या प्रकरणापासून भारतीय जनता पक्षाने स्वतःला दूरच ठेवले आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना संयम दाखवायला हवे होते, असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

“मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्य दिनाचा विसर पडण्यावरून त्यांना (नारायण राणे) आलेला राग योग्य पद्धतीने प्रदर्शित करता आला असता. नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करत नसलो, तरी आम्ही भक्कमपणे त्यांच्यासोबत आहोत”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (संग्रहीत छायाचित्र)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चपराक लावण्याची भाषा केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक लवकरच अटक होऊ शकते. भाजपचे नेते असलेल्या नारायण राणेंच्या या वक्तव्यामुळे भाजप-शिवसेना वाद अधिकच चिघळला आहे.

हेही वाचा 👉 प्राणवायू तुटवड्यामुळे महाराष्ट्रात एकही मृत्यू नाही!

नारायण राणे यांच्याविरोधात प्रथम सूचना अहवाल (एफआयआर) दाखल झाल्यानंतर काही वेळाने नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी त्यांना (राणेंना) तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले. दुसरीकडे, रत्नागिरीतील स्थानिक न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळून लावला आहे.

सोबतच, देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या इतक्या झटपट कार्यवाहीवर शंकाही उपस्थित केली आहे. “मला आश्चर्य वाटत आहे, की हिंदूंना दहशतवादी संबोधणाऱ्या शार्जील उस्मानीच्या विरोधात राज्य शासनाने काहीही केले नाही, पण राणेंच्या बाबतींत अतिशय तत्परता दाखवली आहे”, असे फडणवीस म्हणाले.

काही आक्षेपार्ह सामग्री ट्विट केल्याच्या कारणावरून अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी प्रतिनिधी शार्जील उस्मानीच्या विरोधात जालना जिल्ह्यात मे महिन्यात एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : विरोधकांच्या मुद्द्यांवर निर्णय घ्या!

“…नाहीतर धरणे आंदोलन करणार!”

पोलिसांचा राज्य शासनाकडून गैरवापर केला जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी लावला आहे. तसेच, भाजप कार्यालयांवर हल्ले करणाऱ्या सर्वांना तातडीने अटक केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

“सर्व पोलीस आयुक्तांना मी सांगू इच्छितो, की ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या कार्यालयांवर दगडफेक आणि तोडफोड केली आहे त्या सर्वांना अटक करण्यात यावी. नाहीतर, पोलीस आयुक्तालयांच्या बाहेर मी धरणा देऊन बसेल”, असे ते म्हणाले. 

काही शिवसेना गटांनी नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून, नाशिकमधील भाजप कार्यालयांवर दगडफेक केली. नागपूरमध्येही राणेंच्या विरोधात विरोध प्रदर्शन करण्यात आले. नारायण राणे यांच्या मुंबईतील निवस्थानासमोर शिवसेनेची युवा आघाडी व भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याच्याही घटना घडल्या. 

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा मराठी ब्रेनसोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: