अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ कायद्यानुसारच : राज्यपाल कोश्यारी

“अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा विद्यापीठ कायद्यानुसारच होतील आणि यानुसार संबंधित निर्णय घेतले जातील”, असे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना कळवले आहे.

 

ब्रेनवृत्त | मुंबई

“अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा विद्यापीठ कायद्यानुसारच होतील आणि यानुसार संबंधित निर्णय घेतले जातील”, असे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे कळवले आहे. त्यामुळे राज्यपालांची ही भूमिका आणि राज्य शासनाने दोन दिवसांआधी घोषित केलेला निर्णय यांत विरोधाभासाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

‘कोव्हिड-१९’मुळे ओढवलेल्या टाळेबंदी काळात महाराष्ट्राची परिस्थिती सद्यातरी परीक्षा घेण्यायोग्य नसल्याने राज्य शासनाने सरासरी गुणांकनाचा निर्णय घेतला होता. याअंतर्गत, सर्व सत्रांतील गुणांच्या सरासरीवर आधारित गुण अंतिम वर्ष/सत्रांसाठी दिले जातील. मात्र, आता परीक्षांसंदर्भातील अंतिम निर्णय राजपाल घेणार असून, अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील निर्णय विद्यापीठ कायद्यानुसार होणार असल्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले आहे.

वाचा : शालेय शिक्षणाला सुरुवात करायची! पण कशी?

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेण्यात येईल असे कळविले आहे”, असे राज्यपाल कार्यालयातून ट्विटण्यात आले आहे.

“अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होईल”, असेेेही राज्यपालांनी म्हटले आहे. यामुुुुळे राज्य शासनाचा दोन दिवसांपूर्वीचा निर्णय राज्यपालांना मान्य नसल्याचे दिसते. त्यामुळे, अंतिम वर्षाच्या परिक्षांविषयीचा निर्णय अजूनही अधांतरी असल्याचे समजते.

दरम्यान, भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर एटीकेटी असणाऱ्या विद्यार्थांचे काय होईल, असा प्रश्न उपस्थित केला होता. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले आहे आणि राज्यपालांचीही भेटही घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: