‘रेमडेसिवीर’ ठरले ‘कोव्हिड-१९’वरील एकमेव मान्यताप्राप्त औषध!

अमेरिकेच्या ‘अन्न आणि औषध प्रशासना’ने (एफडीए) ‘गिलीड सायन्सेस’द्वारे तयार करण्यात आलेल्या ‘रेमडेसिवीर’ या प्रतिविषाणू औषधीला ‘कोव्हिड-१९’ रुग्णांवर उपचारासाठी वापर करण्याची मान्यता दिली आहे. येत्या आठवड्यात या औषधीचे प्रत्यक्ष प्रयोग सुरू करण्यात येणार असल्याचेही संस्थेचे सीईओ डॅनियल यांनी सांगितले आहे.

ब्रेनवृत, ४ मे

संपूर्ण जगभरात ‘कोव्हिड-१९‘ने हाहाकार माजवला आहे, मात्र या महामारीवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. अमेरिका, स्पेन, चीन, इटलीसारख्या देशांत तर कोरोनाने सुमारे अर्ध्या लाख लोकांचे बळी घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शास्त्रज्ञ, विविध संस्था आणि प्रयोगशाळा या आजारावरील उपचाराचा शोध घेण्याच्या प्रयत्नात आहेत. अशात आशेचा किरण म्हणून अमेरिकेच्या ‘अन्न व औषध प्रशासना’ने (एफडीए) ‘कोविड -१९’ च्या रुग्णांच्या उपचारासाठी ‘रेमडेसिवीर’ (Remdesivir) या औषधीच्या तातडीच्या वापरास मान्यता दिली आहे.

गिलीड सायन्सेस’ (Gilead Sciences) या औषधनिर्माण आणि संशोधन संस्थेद्वारे तयार करण्यात आलेले हे प्रतिविषाणू औषध (Antiviral Drug) ह्या आठवड्यात रुग्णांवरील उपचारासाठी उपलब्ध होणार आहे. याबाबतची माहिती गिलीड सायन्सेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल ओडे यांनी सीबीएस या अमेरिकी वृत्तवाहिनीला दिली. सुरुवातीला घेण्यात आलेल्या ‘रेमडेसिवीर’च्या ट्रायल्सनंतर कोरोना संक्रमित रुग्णांवर या औषधाच्या वापराणे आरोग्यात वेगाने सुधारणा होत असल्याचे संस्थेतील संशोधकांना आढळून आले. भारतीय-अमेरिकन डॉक्टर अरुणा सुब्रह्मण्यम यांचाही या संशोधकांमध्ये समावेश आहे.

आता ‘एफडीए’ने ‘कोविड -१९’ च्या रूग्णांच्या उपचारासाठी रोग प्रतिबंधक ड्रग ‘रेमडेसिवीर’च्या वापरास मान्यता दिली असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. तर आरोग्य व मानव सेवा मंत्री अलेक्स अझर यांनीदेखील या वृत्ताला पुष्टी दिली आहे. ‘कोविड -१९’च्या लढाईसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या मंजुरीसह रेमिडेसीवीर अमेरिकेत वितरीत केले जाणार असून, गंभीर आजारी आणि लहान मुलांच्या उपचारांमध्ये त्याचा उपयोग केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्वाईन फ्लू : दक्षता हाच सर्वोत्तम उपाय

● ‘रेमडेसिवीर’ची निर्मिती आणि सकारात्मक प्रतिसाद

‘रेमडेसिवीर’ प्रतिविषाणू काही इतर संबंधित व्हायरससह इबोला विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी विकसित करण्यात आले होते. रेमडेसिवीर विषाणूंची वाढ थांबविण्याचे कार्य करते. अमेरिकेतही सुरुवातीला कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसीवीर देण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे आढळून आले. तर कॅलिफोर्नियातील ज्या रुग्णाची वाचण्याशी शक्यता कमी होती, त्या रुग्णालाही रेमडेसिवीर दिल्यानंतर त्याच्या प्रकृतीतही सकारात्मक परिणाम दिसून आले.

दुसरीकडे, अमेरिकेतील बऱ्याच रुग्णालयात कोरोना विषाणूच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी मलेरियाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ नावाचे औषध वापरले जात आहे. भारताद्वारे या औषधांचा अमेरिकेला पुरवठा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या ‘अ‍ॅमडसे’ या वैद्यकीय मासिकात कोरोनव्हायरस संक्रमित रूग्णांवर उपचार  करण्यासाठी ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन‘ (एचसीक्यू) आणि ‘टॉसिलिझुमाब‘ हे वापरले जात असल्याचे माहिती प्रकाशित आहे. भारतीय-अमेरिकन हृदयरोग तज्ज्ञ निहार देसाई यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन बद्दल या मासिकाला सांगितले की, “हे एक स्वस्त औषध आहे, हे अनेक दशकांपासून वापरले जात आहे आणि लोकांना त्यातून समाधान वाटते.”

‘आयोडीन’युक्त मीठ, आरोग्य आणि राष्ट्रीय धोरण

दरम्यान, ‘रेमडेसिवीर’च्या सुरुवाती वापरला एफडीएने अधिकृत मान्यता दिल्यानंतर ‘कोव्हिड-१९’ वर या औषधीने उपचार करण्याचा मार्ग अमेरिकेत मोकळा झाला आहे. लवकरच कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी या औषधीचा पुरवठा जगभरात करणे शक्य होणार असल्याच्या आशाही सीईओ डॅनियल यांनी व्यक्त केली आहे.

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: