सिंधुची वर्ल्ड टूर फायनल्सच्या अंतिम फेरीत झेप!
मराठीब्रेन ऑनलाइन
ब्रेनवृत्त | बाली
भारताची जगप्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधूने आज जपानच्या अकाने यामागुचीचा (Akane Yamaguchi) पराभव करत, बीडल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सच्या (BWF World Tour Finals) अंतिम फेरीत झेप घेत आहे. आज दीर्घकाळ चाललेल्या अटीतटीच्या उपांत्य सामन्यात सिंधूने बाजी मारत या हंगामात तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.

वाचा 👉 अंजु बॉबी जॉर्जची लांब उडी; ठरली ‘वुमन ऑफ द इयर’!
जागतिक क्रमवारीत अद्याप आपले वरचे स्थान राखून असलेल्या व दोनदा ऑलम्पिक पदक जिंकणाऱ्या सिंधूने आज अतिशय चुरशीच्या बॅडमिंटन खेळात बाजी मारली. सिंधूने जपानच्या यामागुचीचा २१-१५, १५-२१ आणि २१-१९ ने पराभव केला.
बीडल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सच्या अंतिम फेरीतील प्रवेशासह सिंधूने या हंगामात एकूण तिसऱ्यांदा एखाद्या टुर्नामेंटच्या अंतिम फेरीत झेप घेतली आहे. २०१८ मध्ये तिने पहिल्यांदा वर्ल्ड टूर फायनल्सचे विजेतेपद पटकावले होते. असा विक्रम करणारी ती एकमेव भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे.
हेही वाचा 👉 मी अर्धा भारतीय झालो आहे : धडाकेबाज डिव्हिलियर्स सर्वच प्रकारांतून निवृत्त
टोकियो ऑलम्पिकमध्ये कांस्य पदक पटकवल्यानंतर सिंधूची कामगिरी चांगली राहिली आहे. सोबतच, याआधी मागील तीन स्पर्धांमध्ये ती उपांत्य फेरीत पोहचली होती. बीडल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्समध्ये खेळण्याआधी सिंधूने फ्रेंच ओपन, इंडोनेशिया मास्टर्स आणि इंडोनेशिया ओपन या स्पर्धा खेळल्या आहेत. मार्चमध्ये झालेल्या स्विस ओपन स्पर्धेत ती उपविजेती होती.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in