Site icon MarathiBrain.in

कोव्हिडवरील औषधींच्या यादीत नव्या औषधीचा समावेश; किंमत बघून थक्क व्हाल!

ब्रेनवृत्त । जिनेव्हा 


जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोव्हिड-१९ पासून प्राण वाचवणाऱ्या औषधींच्या यादीत अजून एका औषधीचा समावेश केला आहे. डब्ल्यूएचओने इंटरल्युकिन-६ रिसेप्टर ब्लॉकर्स (Interleukin-6 receptor blockers) औषधींचा समावेश  या यादीत केला आहे. हे औषधींचे एक संच असून, कोव्हिड-१९ च्या अतिशय गंभीर अवस्थेतील रुग्णांवर उपचार करण्यासाठी यांचा वापर होतो.

जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या इंटरल्युकिन-६ रिसेप्टर ब्लॉकर्स या औषध संचामध्ये टॉसिलीझुमाब (tocilizumab) आणि सारीलुमाब (sarilumab) या औषधींचा समावेश आहे. कोव्हिड-१९ पासून अतिशय गंभीररीत्या प्रभावित झालेल्या रुग्णाला ह्या औषधी कॉर्टिकोस्टिरॉइड या सूजविरोधी औषधसोबत (anti-inflammatory drugs) दिल्या जातात.

 

कोव्हिड-१९ च्या गंभीर रुग्णांमध्ये रोगप्रतिकार प्रणाली गरजेपेक्षा जास्त कार्यरत (overreaction ) होते आणि त्यामुळे रुग्णाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. वरील दोन्ही औषधींचा वापराने हा धोका कमी होणे शक्य असते. या निर्णयाआधी २८ देशांतील वैद्यकीय चाचणी नियत्रकांनी जवळपास २७  चाचणी केंद्रांमध्ये नोंदणी केलेल्या १०,००० हुन अधिक रुग्णांची माहिती डब्ल्यूएचओसोबत सामायिक केली आहे.

वाचा । अखेर मॉडर्नाच्या लसीला भारतात मान्यता!

> इंटरल्युकिन-६ रिसेप्टर ब्लॉकर्सची (टॉसिलीझुमाब आणि सारीलुमाब) वैशिष्ट्ये : 

कोव्हिड -१९ वरील टॉसिलीझूमाबच्या ६०० मिलिग्रॅम मात्रेची किंमत ४१० ते ३,६२५ डॉलर्स इतकी आहे. परंतु या औषधाच्या ४०० मिलिग्रॅम मात्रेची उत्पादन किंमत तुलनेने फक्त ४० डॉलर इतकी आहे.  परिणामी, डब्ल्यूएचओने संबंधित औषध उत्पादकांना या औषधाची किंमत कमी करण्यास म्हटले आहे आणि ते कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये उपलब्ध करवून देण्याचे आदेश दिले आहेत.

 

Joinमराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इत्यादी. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा  www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Exit mobile version