कोव्हिड-१९ उगमाच्या पुनर्तपासाला चीनचा नकार!

ब्रेनवृत्त | बीजिंग 


कोव्हिड-१९ महासाथरोगाच्या उगमाविषयी नव्याने तपास करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या योजनेला चीनने नाकारले आहे. आम्ही राजकीय हेतुपेक्षा वैज्ञानिक हेतूने करण्यात आलेल्या तपासणीत आधीच सहकार्य केले असल्याचे चीनने काल (शुक्रवारी) म्हटले आहे.

सुमारे ४० लाखांहून अधिक लोकांचे जीव घेणाऱ्या व जगभरातील मोठमोठ्या अर्थव्यवस्थांना कोलमडून टाकणारा कोरोना विषाणू पहिल्यांदा चीनच्या वुहान शहरात आढळला होता. दरम्यान, कोव्हिड-१९ या महासाथरोगाच्या उगमाविषयी नव्याने तपास करण्यासाठी परत विचार सुरू झाले आहेत.

याआधी जानेवारी, २०२१ मध्ये डब्ल्यूएचओच्या (WHO) आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या संघाने कोव्हिड-१९ च्या उगमासंदर्भात केलेल्या तपासणीच्या पहिल्या टप्प्याचा अहवाल सादर केला होता. मात्र ही तपासणी उशिरा आणि राजकीय रंगाने झाली होती. तपास गटाने या तपासणीचा अहवाल चीनच्या समकक्ष अधिकाऱ्यांच्या संयोजनाने तयार केला होता. पण ही पाहणी विषाणूच्या उगमाविषयी निष्कर्षापर्यंत पोहचू शकली नाही. 

जग करतोय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रवेश!

दरम्यान, कोव्हिड-१९ च्या उगमाचा तपास पुन्हा सुरू करण्याच्या हेतूने आरोग्य संघटनेने गुरुवारी चीनकडे सुरुवातीच्या काळातील महासाथरोगाने बाधित झालेल्यांची माहितीची मागणी केली. पण चीनने या मागणीला नाकारत म्हटले आहे, की सुरुवातीच्या तपासणीत चीनने केलेली मदत पुरेशी आहे. आता परत माहितीची मागणी करणे म्हणजे यामागे वैज्ञानिक कमी आणि राजकिय हेतूच जास्त आहे.

जानेवारी, २०२१ मध्ये डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञांचा गट तपासणी करून गेल्यानंतर चीनचे उपपरराष्ट्र मंत्री मा झोसु पत्रकारांना म्हणाले होते, “आम्ही राजकीय हेतूने केलेल्या तपासणीचा विरोध करतो आणि संबंधित संयुक्त अहवालाला फेटाळून लावतो. आम्ही फक्त वैज्ञानिक दृष्टीकोनातून केलेल्या तपासणीला सहकार्य करतो.”

हेही वाचा | चीनमध्ये परत आढळला नवा विषाणू ; विषाणूमध्ये मोठ्या साथीची क्षमता !

पहिल्या टप्प्यातील तपासाच्या अहवालात म्हटले आहे, की सहसा विषाणू संसर्गाचे रोग वटवाघूळापासून माणसात एका माध्यम असलेल्या घटकाद्वारे संक्रमित होतात. मात्र वुहान प्रयोगशाळेतून समोर आलेली घटना “अतिशय वेगळी व अनपेक्षित” आहे.

 

आमच्या टेलिग्राम वाहिनीत सहभागी व्हा 👉@marathibrainin


विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा  www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा  writeto@marathibrain.in वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: