काय आहे ‘कलम ३७७’ ?

सर्वोच न्यायालयाने आज भारतीय दंड विधानातील (आयपीसी) ‘कलम ३७७’ बाबत ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. यामुळे समलैंगिकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या समाजसेवी संघटनांच्या आंदोलनांनाही यश मिळाले आहे. 

हे ‘कलम ३७७’ म्हणजे नेमकं काय आहे? याआधी सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिले होते? ह्या निकालाची पार्श्वभूमी काय? हे थोडक्यात जाणून घेऊ या…


● कलम ३७७
    ‘लॉर्ड मॅकॉले’ याने भारतीय दंड संहिता १८६० साली तयार केली. अर्थातच, या संहितेवर ब्रिटिश कायद्यांची छाप होती.

१८६२ मध्ये समाविष्ट केलेल्या, आयपीसीतील कलम ३७७ नुसार ‘अनैसर्गिक संभोग’ हा गुन्हा ठरतो. या कलमाअंतर्गत दोषी ठरल्यास १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड अशी तरतूद आहे.

● अनैसर्गिक संभोग म्हणजे काय ?
     ‘अनैसर्गिक संभोग’ म्हणजे ज्या संभोगातून प्रजनन होणार नाही असा संभोग. संभोग हा फक्त प्रजननासाठीच केला पाहिजे, ही धारणा यामागे आहे. त्यामुळे साहजिकच हे कलम लेस्बियन, गे, बायसेक्शूअल आणि ट्रान्सजेंडर अशांना लागू झाले. इतकेच नव्हे, तर या कलमानुसार एखाद्या प्रौढ विवाहित स्त्री व पुरुष जोडप्याने संमतीने प्रजनन होणार नाही, असे संबंध ठेवले तर तो देखील गुन्हा ठरतो.

● आजच्या निकालाची पार्श्वभूमी 
    २ जुलै २००९ ला दिल्ली उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिला होता. त्यावेळी न्यायालयाने समाजसेवी संघटनांची याचिका मान्य करत समलिंगी प्रौढांमध्ये संमतीने असलेले संबंध कायदेशीर ठरवले होते. ही याचिका ‘नाझ फाऊंडेशन’ या संस्थेने २००१ मध्ये दाखल केली होती.

गेल्या ऑगस्ट महिन्यात सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने समलैंगिक संबंधाच्या कलम ३७७ या विषयावर सुनावणी करून, अंतिम निकालाची सुनावणी तारीख ६ सप्टेंबर २०१८ला असल्याचा निर्णय दिला होता.

◆◆◆

( संदर्भ:  http://letstalksexuality.com )

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: