काय आहे ‘कॉमकासा करार’ ?

भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये गेल्या आठवड्यात ‘टू प्लस टू’ संवादातून ‘कॉमकासा’ या मूलभूत लष्करी संपर्क करारावर  स्वाक्षऱ्या झाल्या. 

 

गेल्या आठवड्यात नवी दिल्ली मध्ये भारत आणि अमेरिका यांमध्ये बहुचर्चित ‘२ + २’ अर्थात, ‘टू प्लस टू संवाद’ पार पडला. यामध्ये ‘कॉमकासा’ (कम्युनिकेशन कंप्याटिबिलिटी अँड सेक्युरिटी ऍग्रिमेंट) करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. यामुळे पाच मूलभूत करारांपैकी भारताने स्वीकृती दिलेल्या करारांत एका नव्या कराराची भर पडली आहे. जाणून घेऊया या कराराबाबत.

नवी दिल्ली येथे ‘ टू प्लस टू’ संवाद बैठकीत भारत आणि अमेरिकेने कॉमकासा करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

● ‘कॉमकासा’ ( Communication Compatibility and Security Agreement: COMCASA) या मूलभूत लष्करी संपर्क करारावर स्वाक्षरी करण्यासाठी भारत आणि अमेरिकेच्या संरक्षण मंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांच्यादरम्यान ‘ टू प्लस टू’ संवादाचे आयोजन ६ सप्टेंबरला नवी दिल्लीत करण्यात आले होते.

 

● कॉमकासाचे वैशिष्ट्य : 

१) अमेरिकेने इतर देशांशी केलेल्या संरक्षण क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान सहकार्यासंबंधी तीन मूलभूत कररांपैकी हा एक करार आहे.

२) ‘कॉमकासा’ शिवाय अमेरिकेचे इतर दोन मूलभूत लष्करी करार म्हणजे ‘लॉजीस्टिक एक्सचेंज मेमोरेंडम ऑफ ऍग्रिमेंट’ ( LEMOA) आणि ‘ बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन ऍग्रिमेंट फॉर जिओस्प्याशिअल कोऑपरेशन’ (BECA) हे आहेत.

३) अमेरिकेद्वारे भारतात विकल्या जाणाऱ्या लष्करी प्लेटफॉर्म्सच्या क्षमतांचा पूर्णपणे वापर करण्यासाठी आणि या प्लेटफॉर्म्समध्ये उच्चतंत्रज्ञान आधारित सुरक्षित उपकरणे वापरणे सुलभ करण्यासाठी या कराराचा उपयोग होणार आहे.

४) या उच्च तंत्रज्ञान आधारित उपकरणांचे भारताला अमेरिकेकडून हस्तांतरण करण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर चौकट हा करार पुरवतो.

५) अमेरिकेने ‘नॉर्थ अटलांटिक ट्रिटी आॅर्गनायझेशन’ म्हणजेच ‘नाटो’ या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांच्या संघटनेबाहेरील एखाद्या देशाशी प्रथमचअसा करार केला असल्यामुळे ‘कॉमकासा’चे वेगळेच महत्त्व आहे.

६) ‘कॉमकासा’ कराराचा भारताला होणार असलेला सर्वात मोठा लाभ हा आहे, की या करारामुळे भारताला अमेरिकेच्या मदतीने चीन व पाकिस्तानच्या हालचालींवर नजर ठेवता येणार आहे. विशेषत: हिंद महासागरात अलीकडे जरा जास्तच वावरू लागलेल्या चिनी पाणबुड्यांची माहिती मिळविण्यासाठी या कराराचा खूप लाभ होणार आहे.

 

◆◆◆

 

‘मराठी ब्रेन’ वर तुम्हालाही लिहावंसं वाटतं? व्यक्त व्हावंसं वाटतं? मग विचार कसला….

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: