काय आहे ‘सौभाग्य योजना’?

मराठी ब्रेन, २३ ऑक्टोबर

● सौभाग्य योजना (सहज वीज घरोघरी) 

Saubhagya Scheme – Pradhan Mantri Sahaj Bijli Har Ghar Yojana (सहज बिजली हर घर योजना)

देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व घरांमध्ये ३१ मार्च २०१९ पर्यंत वीज जोडणी देण्याचा निर्धाराने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्ताने २५ सप्टेंबर २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता. संपूर्णपणे देशाचे विद्युतीकरण करणारी ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेला यावर्षी एक वर्ष पूर्ण झाले.

 

● सौभाग्य योजनेची वैशिष्ट्ये:

  1. सन २०११ मध्ये झालेल्या सामाजिक आणि आर्थिक जनगणनेत नोंदविण्यात आलेल्या गरिबांना मोफत वीज जोडणी देणे.
  2. ज्या कुटुंबांना २०११ च्या सामाजिक-आर्थिक जनगणनेत नोंदविण्यात आलेले नाही, अशा दारिद्र्य रेषेखालील व इतर कुटूंबांना ₹५००च्या मोबदल्यात वीज जोडणी उपलब्ध करून देणे. हे पाचशे रुपये संबंधित कुटुंबांना दहा टप्प्यांत भरता येतील.
  3. दुर्गम क्षेत्रात विजेपासून वंचित असलेली कुटुंबांना बॅटरी बँक उपलब्ध करून देणे. ही बॅटरी बँक २००-३०० WP सौरऊर्जेचा पाक आहे. या बॅटरीच्या आधारे पाच एलईडी बल्ब, एक डीसी आधारित पंख आणि एक डीसी पॉवर प्लग ला वीज पुरवठा होऊ शकतो.
  4. संबंधित सौरऊर्जाजा पॅकला ५ वर्षांची देखभाल आणि दुरुस्तीची हमी असणार आहे.
  5. या योजनेअंतर्गत ३१ डिसेंबर२०१८ पर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना घरघुती वीज जोडणीचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे.
  6. या योजनेची अंमलबजावणी ‘ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ मर्यादित (Rural Electrification Corporation Limited) या केंद्रीय संस्थेकडून होणार आहे.

 

● योजनेची आतापर्यंतची स्थिती:

१ एप्रिल २०१५ च्या आकडेवारीनुसार देशात १८, ५४२ घरे विना-वीजजोडणीची होती. त्यांपैकी, ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत १५, १८३ गावांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. अर्थिक सर्वेक्षण २०१७-१८

सौभाग्य योजनेचा राज्यनिहाय साप्ताहिक आढावा. ऑक्टोबर २०१८

स्रोत : saubhagya.gov.in 

सौभाग्य योजने अंतर्गत राज्यातील आतापर्यंतचे विद्युतीकरण

‘ग्रामीण विद्युतीकरण महामंडळा’च्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार १६ जानेवारी २०१८ पर्यंत १८.१ कोटी ग्रामीण घरांपैकी १४.२ कोटी (७८%) घरांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. RECL

 

©marathibrain.com

◆◆◆

तुमच्या लिखाण, अभिप्राय आणि सूचनांचे www.marathibrain.com वर स्वागत आहे.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: