जाणून घ्या मुळव्याधीवरील घरगुती उपाय

मागील आठवड्यात आपण आम्लपित्त होण्याची कारणे, त्यांची लक्षणे व त्यांवर उपलब्ध असलेले विविध उपचार यांची चर्चा केली होती. आज आपण मूळव्याधीवर उपलब्ध असलेले काही घरगुती उपचारांबाबत जाणून घेऊया.

● मूळव्याधीविषयी घ्यावयाची काळजी:

या आजारात शौचावाटे रक्त बाहेर पडते आणि त्या ठिकाणी खूप वेदनाही होतात. तिखट खाणे, कोरडा आहार, वेग अडवून धरण्याची सवय, तंबाखू – गुटखा यांसारखी व्यसने, दारूचे व्यसन, रात्री जागरण, इत्यादी कारणांनी बद्धकोष्ठता होत असते. यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये.

● मूळव्याधीवर उपलब्ध असलेले उपाय: 

१. मूळव्याध असणाऱ्या रुग्णांना मुळ्याची पाने किंवा त्यांचा रस दिल्याने फायदा होतो. मुळ्याच्या कंदापेक्षा त्याच्या पानाच्या रसात अधिक गुणधर्म आढळतात.

२. रात्री झोपताना अर्धा चमच एरंडतेल घ्यावे किंवा गरम दुधात तूप घालून प्यावे. जेवणामध्ये कोरडा आहार घेऊ नये. वरण, आमटीमध्ये ते कालवून खावे.

३. मुळव्याधीचा त्रास जाणवत असल्यास, प्रथम ज्येष्ठ मध पावडर तुपात मिसळून, दिवसातून तीन वेळा साजूक तुपासह चाटण घ्यावे. यामुळे शौचास मऊपणा येतो. घरामध्ये एखादा पसरट टब असल्यास त्यामध्ये ज्येष्ठ मध पावडर पाण्यात घालून बसावे, त्याचा चांगला उपयोग होतो.

४. रक्त जात नसणाऱ्या मुळव्याधीत सुरण, ताक, मनुका इ. पदार्थ मलावरोध नष्ट होईल. अधिक प्रमाणात सेवन करावे

५. आवळा, ताक, लोणी, बकरीचे दुध, सुरण, गायीचे तुप, जुना तांदुळ, मनुका हे पदार्थ मुळव्याध या विकारात नित्य सेवन करावे.

६. मूळव्याधीवर हिंगाचा लेप लावल्यास लवकर आराम होतो.

७. कारल्यांच्या पानांचा ३ चमचे रस, एक ग्लासभर ताकातून रोज दुपारी महिनाभर घेतल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो. यासोबच कारल्याची मुळे स्वच्छ धुवून वाटून त्याचा कोंबावर लेप लावल्यास मूळव्याधीचे कोंब नाहीशी होतात.

८. सकाळी उपाशी पोटी एक कप गायीच्या थंड दुधात एक लिंबु पिळून ते दुध फाटायच्या आधी प्यावे. असे सलग तीन दिवस करणे.

९. रात्री गरम दुधात साजूक तुप(गायीचे )घालून ते एक कप पिणे.

१०.  दरदिवशी एक पूर्ण मुळा ८ दिवसापर्यंत खा किंवा त्याचे रस व सोबत सेंधव मीठघ्या.

११. रात्री मुठभर शेंगदाने भिजत घालून सकाळी उपाशीपोटी खा.

१२. त्रिफळा चुर्ण रात्री दुधातून घ्या.

१३. पुरेपूर झोप घ्या. ताणतणापासून दुर रहा.

१४. काळं मीठ एक चमचा लिंबाच्या रसमधून सकाळीच घेणे.

१५. सकस व पोषक, सहज पचेल असा आहार घ्या वा आहारात सुरणाच्या कंदाचा व मुळ्याचा वापर करा.

१६. हिरवी मिरची, तिखट लसूण, आले व गरम मसाले  पदार्थ खाणे टाळणे. गोड ताक पिणे.

● व्यायाम :
दररोज ३० मिनिटे व्यायामाने मुळव्याधीपासून बराच आराम मिळेल.
अनुलोमीलम   १० मिनिटं
कपालभाती     १० मिनिटं
पुरक हालचाली १० मिनिटं
मंडुकासन १४ वेळ

वरील उपायांनीही जर मुळव्याधीत फरक पडला नाही, तर ऑपरेशन टाळण्यासाठी किंवा इतर उपायांसाठी वैद्यांचा, डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.  कारण तुम्हाला होत असलेले त्रास नक्की हे मुळव्याध , भगंदर, फिस्टुलाचा त्रास आहे की नाही, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

आम्हाला लिहा writeto@marathibrainn. com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: