नक्षलवाद्यांचे ६ स्फोट; एक नक्षलवादी ठार

वृत्तसंस्था

कांकेर, ११ नोव्हेंबर 

छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील कोयली बेडा भागात नक्षलवाद्यांनी आज आयईडीचे तब्बल 6 स्फोट घडवून आणले. यामध्ये सीमा सुरक्षा दलाचा (बॉर्डर सेक्युरिटी फोर्स) एक जवान जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

आज सकाळी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या कोयली बेडा भागात 6 स्फोट घडवून आणले. यया भागात नक्षलवाद्यांनी आयईडीचे सीरीज प्लांट करून ठेवले होते. या चकमकीत एका नक्षलवाद्याला ठार करण्यात बीएसएफला यश आले.

छत्तीसगडमध्ये उद्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. संबंधित क्षेत्र नक्षल प्रभावित असल्या कारणाने योग्य ती सुरक्षा व्यवस्था शासनातर्फे केली जात आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या काही तासांपूर्वी या भागात आयईडीचे 6 स्फोट झाले. या स्फोटानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शोधमोहिमेत पोलिसांना काळ्या रंगाच्या गणवेशात एका नक्षलवाद्याचा मृतदेह मिळाला. तसेच एक बंदूक आणि इतर सामानही मिळाले आहे. याप्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.

तर, दुसऱ्या एका घटनेत कांकेर जिल्ह्यात सुरुंग स्फोटात बीएसएफचे उपनिरीक्षक महेंद्र सिंह जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना बाहेर काढण्याचे काम केले जात आहे.

नुकतेच एएनआयकडून छत्तीसगडमधील निवडणुकांसाठी सुरू असलेल्या बंदोबस्तांचे वृत्त प्रकाशित झाले आहे.

 

◆◆◆

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: