पुन्हा सर्जिकल स्ट्राईक?

नवी दिल्ली, २४ सप्टेंबर

गेल्याच आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये तीन पोलिसांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली. यामागे पाकिस्तानच हात असल्याचे कळल्यावर भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज व्यक्त केली आहे.  यावेळी लष्करप्रमुखांना भारतीय सैन्याकडून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक केला जाणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणले की, ‘सर्जिकल स्ट्राईकचा वापर सरप्राईज म्हणून केला जातो. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक सरप्राईज म्हणूनच राहू द्या.’

संयुक्त राष्ट्रच्या महासभेतील भारत व पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीआधी जम्मू-काश्मीरमध्ये तीन पोलिसांची दहशतवाद्यांनी निर्घृणपणे हत्या केली. या हत्यांचे आदेश सीमेपलीकडून देण्यात आल्याचे पुरावे भारतीय सुरक्षा दलांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे शासनाने न्यूयॉर्कमध्ये होऊ घातलेल्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द केली. या निर्णयाचे लष्करप्रमुखांनी समर्थन केलं. ‘शांततेसाठीची चर्चा आणि दहशतवादी कारवाया एकाचवेळी होऊ शकत नाही. सरकारनं चर्चा रद्द करुन अगदी योग्य निर्णय घेतला आहे. आम्ही दहशतवादाला पायबंद घालू इच्छितो, हे दाखवणारी एखादी ठोस कृती पाकिस्ताननं करुन दाखवावी,’ असे लष्करप्रमुख म्हणाले.

जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी कारवायांचं मूळ नेमकं कुठे आहे, यावर बोलताना लष्करप्रमुख म्हणाले की. ‘आम्ही आमच्या देशाच्या सीमेचा वापर शेजारी देशांमध्ये दहशतवाद पसरावा यासाठी करत नाही, असं ते वारंवार म्हणतात. मात्र दहशतवादी कारवाया कुठून सुरू आहेत, हे आपण पाहतच आहोत. दहशतवादी सीमेपलीकडूनच जम्मू-काश्मीरमध्ये येतात, हे आपण वारंवार पाहिलं आहे,’ पाकिस्तानला त्यांच्याच शब्दात उत्तर द्यायला हवं, असंदेखील ते म्हणाले.

 

♦♦♦

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: