गुगल तुमच्या मर्जीविना लक्ष ठेऊन आहे तुमच्या सर्व हालचालींवर

मुंबई : गुगल तुमच्या मर्जीविना तुम्ही कुठे आहात? तुम्ही कुठे जाता? तुमच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेऊन आहे. गुगलकडे तुमच्या प्रत्येक हालचालीची सर्व माहिती असल्याचा खुलासा एका रिपोर्टमध्ये झाला आहे. गुगलच्या अनेक सेवा अॅन्ड्रॉईड आणि आयफोनमध्ये आहेत, ज्या पर्सनल सेटिंग्सनंतरही तुमच्या लोकेशनचे रेकॉर्ड सेव्ह करत असल्याचे रिसर्चमध्ये समोर आले आहे.

या गोष्टीचा खुलासा प्रिंसटनमध्ये कॉम्प्युटर सायन्स रिसर्चरने केला आहे. गुगल अनेकदा तुमच्या पर्सनल माहितीचा वापर करण्यासाठी आधी परवानगी मागतो. गुगल मॅपसारखे अॅप वापरण्यासाठी गुगल तुमच्या लोकेशनची माहिती मागतो. तुम्ही परवानगी दिल्यानंतरच गुगल मॅप टाईमलाईनमध्ये हिस्ट्री दाखवतो. पण गुगलला तुमच्या प्रत्येक स्थितीची माहिती असणे तुमच्या प्रायव्हसीसाठी धोकादायक आहे. गुगलने यासाठी एक पर्याय दिला आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमची माहिती देणे बंद करु शकता. ज्यामुळे तुमचे लोकेशन स्टोअर होणे बंद होते. त्यामुळे तुम्ही कुठेही गेलात तरी तुमच्या लोकेशनची माहिती स्टोअर होणार नाही. पण तुमच्या लोकेशनची माहिती स्टोअर होणार नाही, ही बाब खरी नाही. लोकेशन हिस्ट्री बंद केल्यानंतरही गुगल अॅप तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या लोकेशनची माहिती स्टोअर करतो.

याशिवाय गुगल अकाउंटमध्ये चॉकलेट चिप कुकीज किंवा किंड्स सायन्स किट्ससारख्या सर्चद्वारेही तुमची अधिकाअधिक माहिती सेव्ह केली जाते. जगभरातील दोन अरब अॅन्ड्रॉईड युजर्स आणि लाखो आयफोन युजर्ससाठी ही समस्या आहे, जे सर्च किंवा मॅपसाठी गुगलवर विश्वास ठेवतात.
सौजन्य: दैनिक माझापेपर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: