तृप्ती देसाई सात तासांपासून विमातळातच!
मराठीब्रेन वृत्त
कोची, १६ नोव्हेंबर
शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यासाठी गेलेल्या भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना विरोधक भाविकांनी आज कोचीन विमानतळावरच अडवून ठेवले आहे. देसाई यांनी महाराष्ट्रात परत जावे असाही इशारा विरोधकांनी दिला आहे.
‘प्रार्थनेचा अधिकार’ (Right To Pray) चळवळीच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई वादातीत शबरीमला मंदिर प्रवेसशासाठी आज केरळमध्ये पोहचल्या. मातृभूमी ने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार तृप्ती देसाई आज पहाटे ५ वाजता निदुंबसेरी विमानतळावर पोहचल्या. मात्र त्या तिथून बाहेर पडूच शकल्या नाही. त्यांना तब्बल सात तास विमानतळातच राहावे लागले आहे.
तृप्ती देसाई विमानतळावर पोहचताच विरोधकांना त्यांना विमानतळातच अडवून ठेवले. हे विरोधक भारतीय जनता पक्षाच्या साहाय्याने विविध मंत्रोच्चारण करत देसाईंचे विरोध करत आहेत. या विरोधाचे आजूबाजूच्या परिसरात तीव्र प्रभाव पडले असल्याचे जाणवते. देसाईंच्या येण्याआधीच विरोधक विमानतळाबाहेर उभे होते. देसाईंना तिथून कोट्टायम जायचे होते. मात्र भीतीच्या पोटी तेथील टॅक्सी चालकानेही त्यांना कोट्टायम घेऊन जाण्यास नकार दिला.
Kochi: Trupti Desai, founder of Bhumata Brigade, having breakfast at Cochin International Airport as she hasn't been able to leave the airport yet due to protests being carried out against her visit to #Sabarimala Temple. #Kerala pic.twitter.com/ILDV7silTx
— ANI (@ANI) November 16, 2018
दरम्यान, या सर्व विरोधानांही न घाबरता तृप्ती देसाईने देवाचे दर्शन करूनच परत जाणार असल्याचे म्हटले आहे. ‘माझी पोलिसांना पूर्ण सहकार्य करायची तयारी आहे. ते सांगतील त्या ठिकाणी मी थांबायला तयार आहे. पण काहीही होवे, मात्र मी देवाचे दर्शन करूनच परत जाणार आहे’, असे तृप्ती देसाई म्हणाल्या. विरोधकांनी ‘तृप्ती देसाई समोरच जाऊ शकत नाही. तिने महाराष्ट्रात परत जावे’, असे नाऱ्यांसह जोर धरला.
केरळमध्ये येण्यापूर्वी तृप्ती देसाई यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांकडे स्वतःसाठी विशेष पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना विशेष संरक्षण देण्यात येऊ शकत नसल्याचे सांगितले आहे. शिवाय, केरळच्या प्रवासासाठीचे व शबरीमला मंदिर प्रवेशाशी निगडित खर्चही केरळ सरकारने उचलावा, अशी मागणी तृप्ती यांनी केली असल्याचे कळते. Swarajya
◆◆◆