‘प्रश्नांचं उत्तर?’
मस्त थंडी पडली होती, म्हनान म्हटलंय फिरान येवया. पोराक शनिवारची सकाळची शाळा म्हणून शाळेत सोडून इलय, वाटेत आबांचा घर दिसला. म्हटला इलय तर हाक मारून जावया.
सकाळीच आबा ढोरा सोडून येवन पेळेवर बसले होते , हाक मारलंय,
“ओ आबानू”
आबा: बस रे कधी ईल ?काय म्हणता कामधंदो ? बायकोक नेतस काय मुंबयेत ? (आबांनी प्रश्नांची रीघ लावल्यानी.)
मी: पोराची पयली सुरू झाली की जून मध्ये नेतय मुंबईत, पोरांचो थोडो खर्च हा!
( आबांची नजर बरोबर माझ्या चेहऱ्यावर होती. )
बाजाराक लवकर जावक-गावाक होया म्हणून आबा आज फाटफटी उठले होते , ९ ची एसटी तरी गावाक होई म्हणून सगळी धावाधाव चलली होती. इतक्यात काकी (आबांची बायको) हातात झाडू घेवन खळा साफ करीत इली.
“ओ! वायच उठा , केर मारुचो हा…”
आबा: काय गो आज तू पण लवकर केर मारत तो?
काकी: काल गण्यान राती फोन केल्यानं सकाळी गावाक येतंय म्हनान. पोर येवक झालो , आजून सगळी कामा आसत तशीच हत , उठा लवकर हैसुन!
आबा: काय बाई आकडतहा झिल येता म्हनान , काय गो किती वर्षा झाली तेका मुंबयेत जावन ?
काकी: पोरांन १२ वि केल्यानं अन बाजूच्या बबण्या बरोबर गेलो मुंबयेक , ७ वर्षा झाली आज येतंय म्हणता हा , ओ तुमका खरा सांगू पोराचा त्वांड बघुक नायय म्हणून जीव कसो वरखाली होता हा.
आबा नि झटकन कांबळा पेळेवर मोठा केल्यानी अन काकीक बसाक सांगल्यानि, गेली ७ वर्षा कशी काढल्यानी तेचे आठवणी जागे करत होते. एकुलतो एक नवसाचो झिल आपल्या नजरेसमोर गेली ७ वर्षा नाया ह्या साफ जाणवत होता. काकीन पदराचो कोन डोळ्याक लावल्यानं तेव्हाच समजला एक आवस म्हनान काय वाटता हा तिका. आबांनी पण डोळ्यात पाणी आणल्याणी अन बोलाक लागले,
“गणेश किती आवडीनं नाव ठेवला तेचा , गणेश जयंतीक जलमाक इलो म्हणून ‘ गणेश’ शंकर ,पार्वती अन मधीच गणपती. नवसान झील झालो म्हणून बारश्याक लय खर्च केलय , पोर हुशार म्हणून मास्तरांका सांगान स्कॉलरशिप च्या परीक्षेत बसवलय , सातवी पर्यत पोरानं कधी पयलो नंबर सोडल्यान नाय, लोकांच्या मजुरेक जावन घराचो न हेच्या शिक्षनाचो खर्च कसोबसो केलाव. अकरावी , बारावीत शाळेत जावक सायकल घेवन दिलंय , आमचो गणो बारावित बोर्डात पयलो इलो तेवा जावं थंय आमचा नाव मोठा केल्यानं तेचा समाधान वाटला होता.बाजूवालो बँकवालो बबनो इलो अन तेका कामाक ठेवतय म्हनान सांगान मुंबयेत घेवन गेलो. जाताना गणो खुशीत होतो अन आमच्या डोळ्यांत पाणी , गेल्या १८ वर्षात पोर कधीच नजरेआड नव्हतो. मुंबई मानावली होती तेका , कधीतरी महिन्यातुन एकदा लँडलाईन वर फोन असायचो. गावाक येवक मात्र तेका सुट्टी कधीच गावत नव्हती.”
आबांचा ह्या आयकताना माझा मन भरून येत होता. आबा काय थांबत नव्हते..
“गणपती क, शिगम्याक तरी येत असा वाटत होता पण नाय इलो…”
“ओ बाबानू! , आये!”
आकाड्यावर हाक आयकाक इली, तरी आबा अन काकी धावत धावत गेले, झिलाक मिठी मारल्यानि , काकी काय रडाची थांबत नव्हती.
“बाबानू रिक्षात २ बॅगा आहेत त्या घरात घ्या.
काय गण्या , कसो आसस ?” आबांनी हळू आवाजात ईचारल्यानी .
“एकदम मजेत बाबा, तुम्ही कसे आहात ? अन तब्बेत कशी आहे ? बाबा तुमच्याकडे थोडं काम आहे, नंतर बोलूया. शुद्ध मराठी भाषेत गण्यांन ईचारपुस केल्यान. मी गण्याला आवाज दिलय अन आपल्या घराकडे निघालंय …
संध्याकाळी आबा धापा टाकीत इले अन उसने अवसान आणून बोलते झाले.
“अरे माझो झिल गावाक कित्या इलो हा माहिती हा , तेका लगीन करूचा हा , मुंबयेत खोली घेवंक पैसे होये हत , तेच्या आजान ठेवलेली जमीन इकुन पैसे देवा म्हणताहा, जमिनिक गिराईक लवकर बघा. माझी तेवढी ऐपत नाय म्हटल्यावर आमचे थोडे वाद झाले रे झिल रागारागात बोललो. माझ्यासाठी तुम्हाला जमीन देखील विकता येत नाही ? मग निघालो मी जातो पुन्हा मुंबई त पुन्हा तोंड देखील दाखवणार नाही!”
“आज वाटता माका चेडू असता तर लय बरा झाला असता…”. बोलता बोलता आबांचे हात थरथरत होते , डोळ्यात पाणी अन एक निराधार झालेलो बापुस आज माझ्यासमोर अगतिक उभो होतो.
आबांका सावरलंय एवढ्यात कोणीतरी ओरडत इलो …
“आबांची बायको जग सोडून गेली रे !!!”
माझ्या मनात प्रश्नांचा काहूर उठला ,नाय नाय माझ्या झीलान उद्या असा काय केल्यानं तर? ,
मग असले आवशी बापाशीक समजून न घेणारे झिल तरी कित्या होये ,? या सगळ्यात ७ वर्षा वाट बघणाऱ्या त्या आवशीची काय चूक ? ९ महिने पोटात बाळगलेलो गोळो आज सुखाचे २ शब्द बोलत नसात तर ती आवस तरी काय करीत ?
सुन्न करणारे प्रश्न ,त्यांची न मिळालेली उत्तरे आणि आबांका घेवन त्यांच्या घराची वाट धरलाव…
लेख:- नितीन नाईक (मालवणी झिलगो)
( कणकवली ) मो- ८१०८२१८०९२