मोदी सरकारच्या काळात भूकबळींचा चढता क्रम

‘ग्लोबल हंगर इंडेक्स २०१८’ (वैश्विक भूक निर्देशांक) च्या अहवालामध्ये भुकेची समस्या प्रामुख्याने असणाऱ्या देशांमध्ये ११९ देशाच्या यादीत भारत १०३ स्थानावर आला आहे. केंद्रातील मोदी सरकारला देशातील भूकबळी समस्या आव्हानात्मक ठरत आहे. भूकबळी संपवणाऱ्या देशांच्या या यादीत २०१४ साली भारत ५५ व्या स्थानावर होता.

 

विकासाच्या गोष्टी करणाऱ्या मोदी सरकारच्या काळात सरकारची झोप उडवणारा अहवाल नुकताच समोर आला आहे. ‘ग्लोबल हंगर इंडेक्स २०१८’ (वैश्विक भूक निर्देशांक) च्या अहवालामध्ये भुकेची समस्या प्रामुख्याने असणाऱ्या देशांमध्ये ११९ देशाच्या यादीत भारत १०३ स्थानावर आला आहे. गेल्या वर्षी भारताचा क्रमांक १००वा होता. यावर्षी भुकेचा प्रश्न सोडवण्य़ासंदर्भात भारताचा क्रमांक खाली घसरला आहे. कुपोषणाची समस्या भारतातल्या प्रमुख राज्यामध्ये आजही तीव्र आहे.

गर्भावस्थेमध्ये आईचे वेगवेगळ्या कारणांनी होणारे कुपोषण, त्यामुळे जन्माला येणारी कमी वजनाची मुले, उपलब्ध असणाऱ्या आहारयोजना राबवण्यातील अपयश, संबंधित योजना फोल ठरल्यामुळे भूकेची तीव्र होत जाणारी समस्या, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, असे अनेक पदर या प्रश्नांभोवती गुंतलेले आहे.

 

●‘ग्लोबल हंगर इंडेक्स’ (GHI) म्हणजे काय?

२००६मध्ये ‘आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थे’ने (इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट) ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’ अर्थात जीएचआय सुरू केले होते. ‘वॉल्ट हंगरलिफ’ नावाच्या एका जर्मन संस्थेने २००६ मध्ये पहिल्यांदा ‘वैश्विक भूक निर्देशांक’ (ग्लोबल हंगर इंडेक्स) लागू केले होते. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेला त्यांचा अहवाल या निर्देशांकाची तेरावी आवृत्ती आहे.

सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेला चीन या यादीत २५व्या क्रमाकांवर आहे. १०३ व्या क्रमाकांवर असलेल्या भारताला या निर्देशांकामध्ये ३१.१ इतके गुणांकन मिळाले असून भूकबळीची समस्या भारतात गंभीर आहे. भारतामध्ये हंगर इंडेक्सचा अभ्यास करताना प्रामुख्याने देशातील कुपोषित लोकसंख्येची टक्केवारी, पाच वर्षाखालील मुलांची खुंटलेली वाढ, पाच वर्षांखालील मुलांमधील मृत्यूदर या चार घटकांवर विचार करण्यात आलेला आहे.

 

● अहवालातील भारताची परिस्थिती:

जगभरातल्या विकसनशील देशांतील भूकबळींच्या समस्येचा आढावा घेऊन ‘इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट’ने गेल्यावर्षी सादर केलेल्या अहवालानुसार ११९ देशांमध्ये भारताचा क्रमांक शंभरावा होता. या यादीत भारत हा बांगलादेश आणि नेपाळ या देशांच्या मागे होता. आता हा क्रमांक १०३ व्या क्रमाकांवर गेला आहे. बालकुपोषण हे प्रमुख कारण असताना अन्नाचा सातत्याने होणारा अपव्यय हेदेखील तितकेच प्रमुख कारण पुढे आले होते.

 

● मृत्यूच्या गर्तेत बालके:

जून महिन्यात राज्यात ० ते ५ वयोगटातील एकूण १२६१ बालके दगावली होती. शून्य ते एक वर्ष वयोगटातील बालमृत्यूंची संख्या १००५ इतकी असून एक ते पाच वर्ष वयोगटातील १५६ मुलांचा मृत्यू झाला आहे. पोषण आहाराअभावी मृत्यूच्या गर्तेत राज्यातील एक लाख २२७ बालके असून आदिवासी भागातील बालकांची संख्या ३८ हजार १९९ इतकी आहे.

पाच वर्षांखालील मुलांचे मृत्यूदर

केंद्रातील मोदी सरकारला देशातील भूकबळी समस्या आव्हानात्मक ठरत आहे. भूकबळी संपवणाऱ्या देशांच्या या यादीत २०१४ साली भारत ५५ व्या स्थानावर, २०१५ मध्ये हे स्थान ८० पर्यंत, २०१६ मध्ये ९७ आणि २०१७ मध्ये १०० अशी घसरण भारताची झाली आहे. मात्र, यंदा म्हणजेच २०१८ मध्ये भारत या यादीत थेट १०३ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर या यादीत पाकिस्तान १०६ व्या क्रमांकावर आहे. पण, ज्या देशासोबत भारत स्पर्धा करतो, तो चीन या यादीत २५ व्या स्थानावर आहे.

वैश्विक भूक निर्देशांकात भारताचे स्थान

● महाराष्ट्रातही बिकट समस्या:

आदिवासी आणि दुर्गम भागामध्ये सातत्याने वाढणारे बालमृत्यू ही महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख समस्या आहे. पोषण योजना, आरोग्यकेंद्राची उभारणी, डॉक्टरांना ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी बंधपात्र सेवेतंर्गत करण्यात आलेली सक्ती, अशा विविध उपाययोजनांच्या नंतरही या परिस्थितीमध्ये फरक पडलेला नाही. ‘एकात्मिक बाल विकास विभागा’च्या अहवालानुसार जून २०१८, या एका महिन्याच्या कालावधीत राज्यात ६ लाख ६९ हजार १४० बालके कमी वजनाची असल्याची नोंद आहे. यामध्ये एक लाख २२७ बालके तीव्र कमी वजनाची तर पाच लाख ६८ हजार ९१३ बालके मध्यम कमी वजनाची आहेत.

वाढ खुंटलेल्या मुलांची आकडेवारी

आदिवासी भागात एक लाख ८५ हजार २३४ बालके कमी वजनाची असून त्यामध्ये तीव्र कमी वजनाची बालके ३८हजार १९९ व मध्यम कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण १ लाख ४७ हजार ०३५ इतके नोंदवण्यात आले आहे.

One-year-old Harinder, who is suffering from severe malnutrition, is weighed by local healthworkers in Udhwara village of Shivpuri district in the central Indian state of Madhya Pradesh April 7, 2010. India ranked 65th out of 84 countries in the Global Hunger Index of 2009, below countries including North Korea and Zimbabwe — hindering India’s ambitions to channel its demographic dividend to fuel its global economic ambitions. Picture taken April 7, 2010. To match feature INDIA-WELFARE/ REUTERS/Reinhard Krause (INDIA – Tags: BUSINESS FOOD HEALTH IMAGES OF THE DAY SOCIETY) – GM1E64K0L4I01

मोदी सरकारच्या काळात विकास कामे करण्याचा आणि भारताला महासत्ता बनवण्याचा संकल्प केला गेला. मात्र प्रत्यक्षात देशातील बालकांची दयनीय अवस्था दाखवणारा अहवाल समोर आल्यानंतर ह्या भयावह परिस्थितीला जवाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तत्कालीन सरकार २०२० साली भारताला ‘महासत्ता’ बनवण्याचे स्वप्न पाहत आहे अशा वेळी हे स्वप्न पूर्ण करणारे आजचे कोवळे हात उद्याचे सुजाण नागरिक असणार आहे, जर तुमच्या समोर ते भूकबळीच्या जाळ्यात अडकले असतील, तर त्यांना तेथून काढण्यासाठी आपण मिळून प्रयत्न करायला हवा. अशावेळी खऱ्या अर्थाने ‘निर्मितीक्षम’ तरुणांची पिढी घडवण्याचे कार्य आपण करू शकलो, तर महासत्तेचे स्वप्न पाहणारा भारत उद्या जगातील सर्वात तरूण देश असेलच यात तिळमात्रही शंका नाही.

 

लेख : अमृता आनप

(पत्रकार,  राजकीय विश्लेषक व सूत्र संचालक)

ट्विटर : @amrutahanap23

ईमेल: amrutahanap23@gmail.com

 

◆◆◆

 

( प्रस्तुत लेख पूर्णतः लेखिकेच्या हक्काधीन असून इथे प्रकाशित होणाऱ्या विचार व मतांशी मराठी ब्रेन दरवेळी सहमत असेलच असे नाही.)

तुमचे अभिप्राय, लिखाण आणि सूचना आम्हाला पाठवा writeto@marathibrain.com वर.

जुळून राहा ‘मराठी ब्रेन’ सोबत फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम, युट्युब आणि व्हाट्सऍपवरही.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: