‘सिग्नेचर’च्या श्रेयासाठी धक्काबुक्की!
नवी दिल्लीत आयोजित बहुचर्चित ‘सिग्नेचर ब्रिज’च्या उद्घाटनप्रसंगी आपचे कार्यकर्ते आणि भाजपचे खासदार मनोज तिवारी यांच्यामध्ये श्रेयासाठी धक्काबुक्कीची घटना घडली असल्याची बातमी समोर आली आहे.
नवी दिल्ली, ५ नोव्हेंबर
बहुचर्चित ‘सिग्नेचर ब्रिज‘च्या उद्घाटन कार्यक्रमात भाजप खासदार मनोज तिवारी आणि आपचे नेते अमानत उल्ला खान व कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिजचे श्रेय घेण्याच्या भूमिकेवरून राजकीय नेत्यांमध्ये ही चकमक झाली असल्याचे जाणवते.
काल नवी दिल्लीमध्ये सिग्नेचर ब्रिजचे उद्घाटन झाले. ब्रिजच्या उद्घाटन कार्यक्र प्रसंगी राजकीय कार्यकर्त्यांमध्ये श्रेयासाठी शाब्दिक आणि शारीरिक आरोप-प्रत्यारोपाची चकमक बघायला मिळाली. भाजप खासदार मनोज तिवारी आणि अमानतउल्ला खान व इतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या भांडणाचा एक व्हिडिओ ‘टाइम्स नॉऊ’ ने प्रकाशित केला आहे. या व्हिडिओत मनोज तिवारी स्टेजवर चढत असताना अमानतउल्ला खान त्यांना धक्का मारून ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
AAP Neta pushes BJP MP Manoj Tiwari during the inauguration of Signature Bridge in Delhi #AAPVsBJPMP pic.twitter.com/0GjAMrNfd8
— TIMES NOW (@TimesNow) November 4, 2018
चित्रफितीत दाखवल्यानुसार, भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी ‘सिग्नेचर ब्रिज‘ चे श्रेय आम आदमी पार्टी स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. सोबतच मनोज तिवारी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ब्रिजचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. मनोज तिवारींच्या या विधानाच्या विरोधात उपस्थित आप कार्यकर्त्यांनी धक्काबुकी सुरू केली. सुरुवातीला दोहोंमध्ये सुरू असलेली शाब्दिक चकमक धक्काबुक्कीत बदलली. व्हिडिओमध्ये मनोज तिवारी हे स्टेजवर चढण्याचा प्रयत्न करत असताना अमानतउल्ला खान त्यांना ढकलत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, ही धक्काबुक्की होण्याआधी भाजपने गुंडागर्दीचे कृत्य केल्याचेही समोर आले आहे. कार्यक्रमाच्या काही भाजप कार्यकर्त्यांनी तेथील खुर्च्या फेकून देण्याचे प्रयत्न केले असल्याचे व ब्रिजवर लावण्यात आलेले होर्डिंग्स फडण्याचेही प्रयत्न केले असल्याचे वृत्त समोर आले आहे.
‘सिग्नेचर ब्रिज’
आमचे सरकार भाजपच्या दयेने आलेले नाही: पिनरायी विजयन
काल बहुचर्चित ‘सिग्नेचर ब्रिजचे’ दिल्लीत उद्घाटन झाले. आजपासून हा ब्रिज नागरिकांसाठी खुला झाला आहे. राजधानीत आयोजित राष्ट्रीय स्तरावरच्या उद्घाटन कार्यक्रमात झालेली राजकीय नेत्यांमधील ही श्रेयवादाची चढाओढ मात्र राजकीय व्यक्तींच्या मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
◆◆◆