नापिकीमुळे नागपूरच्या शेतकऱ्याने दिला विहिरीत जीव

प्रतिनिधी

नागपूर, ७ नोव्हेंबर

नागपूरच्या घाटंजी तालुक्यातील मुरली (बंदर पोड) गावच्या शेषराव आडे या शेतकऱ्याने बकरीच्या पिल्लासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

नागपूर जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील मुरली (बंदर पोड) गावच्या एक शेतकऱ्याने नापिकीमुळे वैतागून विहिरीत उडी मारून आपला जीव दिला आहे. ही घटना काल घडली आहे. शेषराव बापूराव आडे (५९) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यामागे पत्नी, चार विवाहित मुली आणि एक मुलगा आहे. कर्जबाजारीपणामुळे शेषराव यांनी त्यांच्या घरी असलेल्या बकरीच्या पिल्लासह विहीरीत उडी मारून जीव दिला.

शेषराव यांच्या आत्महत्या करण्यामागे असलेले कारण नापिकी व शासनाचा नाकर्तेपणा हे असल्याचे दिसून येते. ‘शेषराव आडे यांनी कर्जबाजारीपणामुळे केलेली ही आत्महत्या हा भाजपच्या नाकर्तेपणाचा पुरावा आहे’, असे म्हणत शेतकरी न्याय्यहक्क आंदोलन समिती, यवतमाळचे निमंत्रक देवानंद पवार यांनी या घटनेचा निषेध केला आहे. मटा

दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या असून गेल्या सप्टेंबरमध्ये नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात १५ आत्महत्या झाल्या असून चंद्रपूरात गेल्या महिन्यात १२, तर आॅगस्टमध्ये नागपूर विभागात १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
गेल्या नऊ महिन्यात नागपूर विभागात १९२ शेतकरी आत्महत्या झाल्या असून मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ९ महिन्यात २८ आत्महत्या झाल्या आहेत. TV9मराठी

ऑनलाइन लोकमतने  प्रकाशित केलेल्या एका वृत्तानुसार, वऱ्हाडच्या अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात आॅक्टोबर २०१८ पर्यंत १५ हजार ६२९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये सात हजार ८ प्रकरणे पात्र, आठ हजार ४०६ अपात्र, तर २१५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे हे चित्र दुर्दैवी आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: