कोशिकांच्या प्राणवायू ग्रहणावरील संशोधनासाठी यंदाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर

ब्रेनवृत्त | स्टॉकहोम

जगभर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नोबेल परितोषिकांच्या यंदाच्या विजेत्यांच्या नावांची घोषणा कालपासून सुरू झाली आहे. वैद्यकशास्त्र (मेडिसिन) व फिजिओलॉजी या क्षेत्रातील यंदाचे नोबेल तीन वैद्यकशास्त्रज्ञांना संयुक्तपणे जाहीर झाले आहे. अमेरिकी पेशीसंशोधक विल्यम जी केलिन ज्युनियर व सर पीटर जे रॅटक्लिफ आणि ब्रिटिश डॉ. ग्रेग एल सेमेन्जा या तिघांना मानवी कोशिकांच्या प्राणवायू (ऑक्सिजन) ग्रहणावर करण्यात आलेल्या संशोधनासाठी हा पुरस्कार संयुक्तपणे जाहीर झाला आहे.

● आतापर्यंत १२ महिलांसह २१६ जणांना वैद्यकशास्त्रातील नोबेल

१९०१ ते २०१८ पर्यंत वैद्यकशास्त्रात आतापर्यंत १०९ पुरस्कार देण्यात आले आहे. एकूण २१६ विजेत्यांमध्ये १२ महिलांचा समावेश आहे. यात २००९ मध्ये एकाचवेळी दोन महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. इंसुलिनचा शोध लावणाऱ्या फ्रेडरिक जी. बँटिंग यांनी १९२३ साली वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी हा पुरस्कार पटकावला होता. वैद्यशास्त्रात हा पुरस्कार मिळवणारे ते एकमेव तरुण शास्त्रज्ञ आहेत. तर पेटोन राउस (वय ८७) सर्वात जास्त वयस्कर नोबेल पुरस्कार मिळवणारे ठरले आहेत. त्यांना ट्यूमर इंड्यूसिंग व्हायरसच्या शोधासाठी १९६६ साली हा पुरस्कार मिळाला होता.

हेही वाचा : जेष्ठ पत्रकार रवीश कुमार रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी

● नोबेल पुरस्कार घोषणेचे वेळापत्रक

यावर्षीच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यास कालपासून सुरुवात करण्यात आली आहेया. पहिल्या दिवशी वैद्यकशास्त्र क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या नावाची घोषणा नोबेेल पारितोषिकासाठी करण्यात आली. आज भौतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. येेत्या १४ ऑक्टोबरपर्यंत इतर अन्य क्षेत्रातील पारितोषिक विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात येेेईल.

सोमवारी, ७ ऑक्टोबर – वैद्यकशास्त्र
मंगळवार, ८ ऑक्टोबर – भौतिक शास्त्र
बुधवार, ९ ऑक्टोबर – रसायनशास्त्र
गुरुवार, १० ऑक्टोबर – साहित्य
शुक्रवार, ११ ऑक्टोबर – शांतता
सोमवार, १४ ऑक्टोबर – अर्थशास्त्र

 

● यावर्षी दोन साहित्याचे नोबेल

स्वीडिश अकादमी २०१८ आणि २०१९ या दोन्ही वर्षांसाठी साहित्याच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करणार आहे. गेल्यावर्षी लैंगिक शोषण प्रकरण (मी टू) समोर आल्याने २०१८ च्या साहित्य नोबेल पुरस्काराची घोषणा करण्याचे अकादमीने टाळले होते.

यावर्षी साहित्याचा नोबेल नाही !

● नोबेल परितोषिकाचे स्वरूप 

नोबेल पुरस्कार विजेत्या प्रत्येकाला जवळपास साडे चार कोटी रुपये रोख  दिले जातात. तसेच, नोबेल पुरस्काराचे जनक अल्फ्रेड नोबेल यांचा फोटो असलेले २३ कॅरेट सोन्याचे २०० ग्रॅमचे पदक आणि प्रशस्तीपत्र दिले जाते. पदकाच्या दुसऱ्या बाजुला युनानी देवी आयसिसचे चित्र, रॉयल अकादमी ऑफ सायन्स, स्टॉकहोम व पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीची माहिती दिलेली असते.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: