नववर्षाच्या प्रारंभी प्रवाशांसाठी विशेष उपनगरीय गाड्या
नवीन वर्षाच्या प्रारंभी प्रवाशांच्या सुविधेसाठी ४ विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते पनवेल दरम्यान चालणार या गाड्या.
ब्रेनवृत्त | गोपाळ दंडगव्हाळे
मुंबई, ३१ डिसेंबर
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते कल्याण आणि हार्बर रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते पनवेल या मार्गांवर दिनांक १ जानेवारी २०२० रोजी ( आज, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर) प्रवाशांच्या सुविधेकरीता ४ उपनगरीय विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. या उपनगरीय विशेष गाड्या वरील दोन्ही मार्गवरील सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.
प्रातिनिधिक छायाचित्र
● मध्यरेल्वे लाईनवर विशेष गाड्या
१. कल्याण विशेष : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.३० वाजता प्रस्थान करून कल्याण येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष : कल्याण येथून ०१.३० वाजता प्रस्थान करून ०३.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
4 suburban special trains on New Year on 1.1.2020 (after midnight of 31.12.2019) between CSMT and Kalyan/Panvel stopping at all stations for the benefit of commuters. pic.twitter.com/MxMY3tCExE
— Central Railway (@Central_Railway) December 30, 2019
मुंबईची जीवनवाहिनी होणार १५ डब्यांची !
● हार्बर लाईनवर विशेष गाडी
३. पनवेल विशेष : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.३० वाजता प्रस्थान करून ०२.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल.
४. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष : पनवेल येथून ०१.३० वाजता प्रस्थान करून ०२.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
◆◆◆