जाहिराती बघून साबण-तेल निवडा, नेता नको : खासदार अमोल कोल्हे

रायगड, 21 सप्टेंबर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या समारोप प्रसंगी पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना-भाजप पक्षावर काल सडकून टीका केली. “जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्यांची नाही”, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

महाडमध्ये काल आयोजित सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी युती सरकारवर टीकेची झोड उठवली. शहरातील शिवाजी चौक येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युती सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचत आमदार जयंत पाटील यांनी सरकारला टार्गेट केले. तर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आपल्या अनोख्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, अदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला.

पवारांनी आत्मचिंतन करावे : मुख्यमंत्री फडणवीस

“सर्व पातळीवर हे सरकार अपयशी ठरले असून, आता न केलेल्या गोष्टींच्या जाहिराती दाखवून हे सरकार दिशाभूल करत आहे. त्यामुळे जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही” असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मतदारांना केले आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये आयोजित शिवस्वराज यात्रेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे या दोघांनी शिवसेनेवर निशाणा साधला. “बाप सरदार असला म्हणून त्याचा मुलानेही सरदार व्हायला पाहिजे, असे काही नसतेे. काळाच्या पुण्याईवर आजचा दिवस स्वराज्यात उगवत नव्हता. त्या छत्रपतींची ही भूमी आहे” अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेना नेत्यांवर निशाणा साधला.

गडकिल्ल्यांऐवजी मंत्र्यांचे बंगले भाड्यावर द्या : राज ठाकरे

सोबतच, “काळाच्या पुण्याईवर आजचा दिवस स्वराज्यात उगवत नव्हत, त्या छत्रपतींची ही भूमी आहे. खेडवासियांनी याचा विचार करावा, आपल्या अडचणीत जो साथ देतो त्याला आपण साथ द्यायची की वरून आलेले पार्सल आपण डोक्यावर घेऊन मिरवायचे याचाही विचार मतदारांनी करावा, असे बोलून रामदास कदम यांचे चिरंजीव आणि दापोली मतदार संघातून सेनेचे संभाव्य उमेदवार योगेश कदम यांच्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केली. तसेच, “शिवसेनेने कोकणाला काय दिले?” असा सवालही खासदार कोल्हे यांनी स्थानिक मतदारांना केला आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: