पाकिस्तानच्या ताब्यातील वायुसेना वैमानिकाचे फोटो-व्हिडिओ माध्यमांवर शेयर करू नका!
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वायूसेना वैमानिकाची छायाचित्रे आणि व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करणे थांबवावे, असे आवाहन सुरक्षा यंत्रणेद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे.
वृत्तसंस्था पीटीआय
श्रीनगर, २७ फेब्रुवारी
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वायूसेना वैमानिकाची छायाचित्रे आणि व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करणे थांबवावे, असे आवाहन सुरक्षा यंत्रणेद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे.
पाकिस्तानी सैन्याकडून पाच व्हिडिओ चित्रित करण्यात आले असून,भारतावर मानसिक दबाव आणण्यासाठी व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर ते वायरल केले जात आहेत. अशाप्रकारे पाकिस्तान भारताविरुद्ध मानसिक खेळी करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे हे व्हिडिओ नेटकरांनी समाजमाध्यमांवर शेयर करणे थांबवावे, असे आवाहन सुरक्षा यंत्रणांनी केले आहे.
पाकिस्तानचे दोन लढाऊ हेलिकॉप्टर भारताच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर ते भारताने उडवून पूर्णतः ध्वस्त केले. त्यानंतर, पाकिस्तानी सेनेकडून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना बंदी करण्यात आले असल्याचे व्हिडीओ भारतात अनेक नेटिझन्सनी (नेटकरांनी) शेअर केले. असे व्हिडीओ काढून व ते समाजमाध्यमांवर प्रसारित करून पाकिस्तान भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि नागरिकांचे मनोधैर्य कमी करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. संबंधीत छायाचित्रे आणि व्हिडीओ पाकिस्तानी सैन्य आणि मीडियाकडून पसरवले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
Sources: IAF pilot Wing Commander Abhinandan took off in a MiG 21 Bison jet today, he is yet to return pic.twitter.com/coryHqeRsR
— ANI (@ANI) February 27, 2019
‘मिग 21 बायसन’ विमानातून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी सुरक्षितपणे स्वतःला बाहेर काढले, मात्र ते एलओसीजवळ लँड झाल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, पाकिस्तानच्या ताब्यात फक्त एकच पायलट असून, विंग कमांडर अभिनंदन यांना लष्कराच्या नैतिकतेनुसार वागवले जात असल्याचा दावा पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केला आहे. जर अभिनंदन यांना योग्य वागणूक दिली जात नसेल तर पाकिस्तानला खुपमोठ्या नुकसानास सामोरे जावे लागेल.
दुसरीकडे, पाकिस्तानच्या ताब्यात असलेले अभिनंदन यांना जेनेवा कराराच्या अंतर्गत भारताकडे दहा दिवसांच्या आत पाकिस्तानने भारतास सुपूर करणे अनिवार्य आहे. जर असे झाले नाही, तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय कारवाईस सामोरे जावे लागेल व भारताला पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारण्याचा पूर्ण अधिकार असेल.
◆◆◆