न्यूमोनियावरील पहिल्या स्वदेशी लसीला अंतिम मान्यता !

पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’द्वारे विकसित बालकांतील न्यूमोनियावरील पहिल्या स्वदेशी न्यूमोकोक्कल पॉलिसॅकेराइड संयुग्म लसीला (Pneumococcal Polysaccharide Conjugate Vaccine) डीसीजीआयने अंतिम मान्यता दिली आहे.

 

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली

फुफ्फुसाच्या दाहवर (न्यूमोनिया) उपचार म्हणून विकसित करण्यात आलेल्या पहिल्या पूर्णतः स्वदेशी संयुग्म लसीला भारताचे औषध महानियंत्रक (DGCI : Drug Controller General of India) यांनी अंतिम मान्यता दिली आहे. पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या औषध संशोधन व निर्माण संस्थेने ही लस तयार केली आहे.

याआधी सिरीम इन्स्टिट्यूटला या लसीची तीन टप्प्यांमध्ये भारतात वैद्यकीय चाचणी करण्यासाठी परवानगी मिळाली होती. न्यूमोकोक्कल पॉलिसॅकेराइड संयुग्म लस (Pneumococcal Polysaccharide Conjugate Vaccine) असे या लसीचे नाव असूून. भारतासह गॅम्बिया देशातही संस्थेेने या लसीची वैद्यकीय चाचणी पूर्ण केली आहे, असे आरोग्य मंत्रालयाने संबंधित परिपत्रकात म्हटले आहे.

ब्रेनविश्लेषण : भारत क्षयरोग अहवाल २०२०

“औषध नियंत्रकांच्या अध्यक्षतेखालील समितीने संबंधित लसीला बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यास स्वीकृती दिली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे ला पूर्णतः स्वदेशात विकसित करण्यात आलेल्या पहिल्या न्यूमोकोक्कल पॉलिसॅकेराइड संयुग्म लसीची उत्पादन करण्याची परवानगी देण्यात आली होती. यााआधी, सर्व लस निर्माते भारताबाहेरील असल्याने परवानाधारक आयातकांंनाच ही परवानगी दिली जात होती”, असेेही मंत्रालयाने म्हटले आहे.

हेही वाचा : भारतीय बनावटीच्या दुसऱ्या लसीची मानवी चाचणी सुरू

देशाच्या वैद्यकीय चाचणी नोंद कचेरीनुसार, या लसीची पहिली वैद्यकीय चाचणी २०१३मध्ये देशातील ३४ तरुणांवर घेण्यात आली, तर दुसरी चाचणी १२ ते १५ महिने वयाच्या ११४ लहान मुलांवर घेण्यात आली. तर सहा ते आठ महिन्यांच्या वयोगटातील ४४८ नवजात बालकांवरील तिसरी चाचणी मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पूर्ण झाली.

ही लस शरीरावर घातक परिणाम करणाऱ्या आजारांच्या व लहान मुलांमध्ये ‘स्ट्रेप्टोकोक्कस न्यूमोनी’द्वारे होणाऱ्या न्यूमोनिया आजारविरोधात सक्रिय लसीकरणासाठी वापरली जाते.

◆◆◆

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: