भारतात ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’चा वापर सुरूच राहणार : आयसीएमआर
ब्रेनवृत्त, नवी दिल्ली
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) एका अहवालाच्या आधारे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा वापर करु नये, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची वैद्यकीय चाचणी तात्पुरती बंद केली आहे. मात्र, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराने काहीही धोका नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.
आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्स आणि दिल्लीतील तीन खासगी रुग्णालयांमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवर नियंत्रण अभ्यास (कन्ट्रोल्ड स्टडी) करण्यात आला. या अभ्यासामध्ये हे औषध कोरोना आजारावर काम करु शकतं आणि त्याचे फार दुष्परिणामही नाहीत. असा निष्कर्ष काढला आहे. मात्र हे औषध देताना रुग्णाची ईसीजी तपासणे बंधनकारक असल्याचा सल्लाही दिला आहे.
(संग्रहित छायाचित्र)
● हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर धोकादायक
मिलर फॅमिली हार्ट संस्थेचे मुख्य शैक्षणिक अधिकारी डॉ. स्टीव्हन ई. निसेन म्हणाले की, हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या अतिवापरामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्याचवेळी हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील प्रोफेसर डॉ. स्कॉट सोलोमन यांनीही याला प्राणघातक म्हटले आहे. काही आरोग्यतज्ज्ञांच्या मते हे औषध हृदय, मूत्रपिंड आणि यकृतावर परिणाम करत असल्यामुळे रुग्णांना मृत्यूचा धोका अधिक वाढतो.
कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात होत्या. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाची ट्रायल (चाचणी) करण्यास मज्जाव केला आहे.
● हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर कशासाठी होतो ?
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचं भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. मलेरियासोबतच आर्थरायटिस या आजारामाध्येही या औषधाचा वापरले जाते. तथापि, अमेरिकेतही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी या गोळ्या दिल्या जात असून, याचे सकारात्मक परिणामही दिसत आहेत. त्यामुळे इतर देशातही या गोळ्यांच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. या गोळ्यांचा खास परिणाम ‘सार्स-सीओव्ही-2’वर होतो. हा तोच व्हायरस आहे, ज्यामुळे ‘कोव्हिड-१९’ची लागण होते. त्यामुळेच हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांना दिल्या जात आहेत.
● हायड्रॉक्सिक्लोरोक्विन फायदा कमी पण धोकाही शून्य
जागतिक आरोग्य संघटनेने हायड्रॉक्सिक्लोरोक्विन (एचसीक्यू) औषधाचा वापरावर बंदी घातली असली, तरी भारतात मात्र या औषधाचा वापर सुरूच राहणार आहे. भारतात या औषधाचा प्रभाव दिसू लागला. किरकोळ साइड इफेक्ट्स वगळता हे औषध प्रभावी ठरताना दिसते. औषधाची मात्रा लागू होण्याची शक्यता कमीच असली, तरी धोकाही शून्य आहे, अशा शब्दांत डॉ. बलराम भार्गव यांनी उपचाराचे समर्थन केले. भारतात सुरू असलेल्या अभ्यासाचे निष्कर्षही त्यांनी मांडले.