आली! आली! एमपीएससीची नवी जाहिरात आली!

ब्रेनवृत्त । पुणे


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) राज्यातील महत्त्वाच्या पदांच्या भरतीसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ ची जाहिरात आज जाहीर करण्यात आली आहे. यामुळे यंदाच्या सत्रात घेतल्या जाणाऱ्या परीक्षेची वाट बघणाऱ्या लाखों विद्यार्थ्यांची आतुरता संपली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या उद्योग, वित्त व लेखा, प्रादेशिक परिवहन विभाग तसेच इतर महत्त्वाच्या प्रशासकीय पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड केली जाणार आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१’ ची जाहिरात आज जाहीर करण्यात आली असून, ही परीक्षा नव्या वर्षांच्या सुरुवातीला म्हणजेच २ जानेवारी २०२२ ला आयोजित  होणार आहे. एमपीएससीने जाहीर केलेल्या संबंधित प्रसिद्धीपत्रकानुसार यंदाच्या सत्रासाठी एकूण २९० पदांची भरती केली जाईल. यामध्ये उप-जिल्हाधिकारी, गट-अ, पोलीस उप अधिक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट-अ, सहायक राज्य कर आयुक्त, गट-अ, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब, सहायक गटविकास अधिकारी, व तस्यम पदे, गट-ब व इतर पदांचा समावेश आहे. 

प्रातिनिधिक छायाचित्र

वाचा राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ ची संपूर्ण जाहिरात —> राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१

मागील दोन आठवड्यापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पदभरतीसाठी सक्रियता दाखवण्यास सुरुवात केली असून, अनेक रखडलेलेया परीक्षांचे विचार सुरु आहेत. सोबतच, यंदा या आयोगाने काही नवीन पदे निर्माण केली असून, ती राज्यसेवा परीक्षेमार्फत भरण्याचे ठरवले आहे. आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा २ जानेवारी २०२२ ला नियोजित असून, त्यानंतर होणारी मुख्य परीक्षा ७, ८ व ९ मे  २०२२ ला नियोजित आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२१ आहे. 

एमपीएससीचे अंतिम निकाल जाहीर ; एकूण १७ संवर्गांतील ४३१ पदे

मागील महिन्यात आयोगाने प्रलंबित असलेले अनेक निकाल जाहीर केले आहेत. राज्यसेवा २०१९ चा सुधारित निकालही नुकताच जाहीर करण्यात आला आहे. तर सप्टेंबर, २०२१ च्या पहिल्या आठवड्यात आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२०, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा २०२० निकाल जाहीर केला. तसेच अभियांत्रिकी पूर्व परीक्षेचाही निकाल जाहीर झाला आहे. 

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: