पेट्रोलियमच्या दर कपातीचा कोणताही प्रस्ताव नाही

वृत्तसंस्था | आयएएनएस

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली


देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलियम उत्पादांवरील उत्पादन शुल्कात (Excuse Duty) कपात करण्याचा सद्या कोणताही निर्णय नसल्याचे म्हटले आहे. तसेच पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये कपात करण्याचा सद्या कोणताही प्रस्ताव नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

काल आयोजित एक पत्रकार परिषदेत बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलियम दरवाढीविषयी मोठे वक्तव्य केले. पेट्रोलियम उत्पादनांच्या दरांमध्ये सद्या कोणतीही कपात होणार नसल्याचे सांगत त्यांनी नागरिकांच्या हाती निराशाच दिली आहे.

वाचा | प्रदूषणासाठी बीपीसीएल, एचपीसीएलसह चार कंपन्यांना ₹२८६ कोटींचा दंड

“जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर वाढतात तेव्हा आम्हालाही दरवाढ करावी लागते; आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर कमी होतात, तेव्हा आम्हालाही दर कमी करावे लागतात. हे एक बाजापेठीय तंत्र (market mechanism) आहे, जे बाजारपेठेतील तेल कंपन्यांद्वारे स्वीकारले जाते. याबाबत आम्ही त्यांना स्वातंत्र्य प्रदान केले आहे”, असे सीतारामन म्हणाल्या. 

 

हेही वाचा | रामदेव बाबा विकू शकतात ३० रुपयांत ‘पेट्रोल’?

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या, की केंद्र शासन लसी व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांवरील खर्चासोबतच गरिबांना मोफत अन्नधान्य पुरवण्यासाठीही खर्च करत आहे. त्यामुळे, “राज्य शासन पेट्रोलवरील कर आणि इतर शुल्क कमी करून नागरिकांना दिलासा देऊ शकतात”, असे त्या म्हणाल्या.

सोबतच, जोपर्यंत जीएसटी परिषद (GST Council) ठरवत नाही, तोपर्यंत पेट्रोलियम उत्पाद वस्तू व सेवा कर अंतर्गत येणार नाहीत, असेही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. 

 


अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.in ला.

फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.

तुमचे लिखाण, प्रतिक्रिया व सूचना writeto@marathibrain.in वर नक्की पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: